तमाशा कलावंताच्या जिंदगीचाच झाला तमाशा, कोरडगावातील मेळाव्यातून करणार आक्रोश

राजेंद्र सावंत
Thursday, 5 November 2020

साठ वर्षे तमाशात सोंगाड्या म्हणून काम करणा-या हिरामन बडे यांचा राज्य सरकारने उत्कृष्ठ सोंगाड्या म्हणुन पुरष्कार देवुन गौरव केला आता चौ-याहत्तर वर्षे वय असलेल्या बडे यांना वार्धक्यात सरकारचे कलावंत मानधन मिळत नाही हे दुर्दैव आहे

पाथर्डी : लॉकडाऊनमुळे राज्यातील विविध कलावंताच्या कला सादर करता येत नसल्याने सध्या कलावंतावर उपासमारीची वेळ आली आहे. कलावंतांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी राज्यातील तमाशा कलावंत, आराधी, गोंधळी, सोंगाडे, मिमिक्री करणारे कलाकार, ढोलकीवादक यांच्यासह राज्यभरातील कलावंताचा मेळावा आठ नोव्हेंबर रोजी कोरडगाव (पाथर्डी) येथे आयोजित केला असल्याची माहिती कलावंत न्याय हक्क समितीच्या जिल्हाध्यक्षा शिवकन्या कचरे यांनी दिली.

आमदार मोनिका राजळे, जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, कलावंत वन्यायहक्क समितीचे राज्याचे प्रमुख सोमनाथ गायकवाड, संदीप निकम डॉ. अविनाश जाधव, कलावंत विकरास महामंडळाचे अध्यक्ष रघुवीर खेडकर, समाशा कलावंतांच्या अध्यक्षा मंगला बनसोडे, मनोदिप वपार, शहाजी कामले, ज्ञानेश्वर रामदास, सुनीता कराड ही राज्यातील मंडळी मेळाव्यासाठी उपस्थीत राहणार आहे.

हेही वाचा - कुंभारवाड्यावर चिनी ड्रॅगनचा हल्ला

आठ नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी अकरा वाजता कोरडगाव (ता.पाथर्डी) येथे राज्यातील विविध क्षेत्रातील कलावंतांचा मेळावा होईल. ख-या कलावंताच्या अडचणी व त्यांची सोडवणुक करणे हा मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे. तहसीलदार शाम वाडकर यांची बुधवारी शिवकन्या कचरे, भोरु म्हस्के, अरविंद सोनटक्के, सोमनाथ अकोलकर,हिरामन बडे व अनेक कलावंतांनी भेट घेतली मेळाव्याला परवानगी मिळावी अशी मागणी केली.

साठ वर्षे तमाशात सोंगाड्या म्हणून काम करणा-या हिरामन बडे यांचा राज्य सरकारने उत्कृष्ठ सोंगाड्या म्हणुन पुरष्कार देवुन गौरव केला आता चौ-याहत्तर वर्षे वय असलेल्या बडे यांना वार्धक्यात सरकारचे कलावंत मानधन मिळत नाही हे दुर्दैव आहे. आयुष्यभर रसिक प्रेक्षकांना भरभरुन हसवणारा वार्धक्यात रडतो आहे. गुंठाभर जमीन नाही, भाड्याच्या खोलीत राहुन वेळप्रसंगी पडेल ते काम करुन जीवन जगणारे बडे यांना सरकारने मानधन द्यावे, अशी मागणी होत आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Meet at Kordgaon on folk artist questions