esakal | विधानसभेचे पुढचे पुढं पाहू, आता नगरपंचायतीसाठी कामाला लागा : महसुलमंत्री 
sakal

बोलून बातमी शोधा

Meeting of Revenue Minister Balasaheb Thorat in Karjat

कार्यकर्त्याना साथ देणारा पक्ष म्हणजे काँग्रेस आहे. त्यामुळे युवकांनी निष्ठेने काम करत सर्वसामान्य लोकांची कामे करावीत. याचे हमखास फळ मिळेलच. पक्ष मोठा झाला की आपण मोठे होणार आहेत.

विधानसभेचे पुढचे पुढं पाहू, आता नगरपंचायतीसाठी कामाला लागा : महसुलमंत्री 

sakal_logo
By
निलेश दीवटे

कर्जत (अहमदनगर) : कार्यकर्त्याना साथ देणारा पक्ष म्हणजे काँग्रेस आहे. त्यामुळे युवकांनी निष्ठेने काम करत सर्वसामान्य लोकांची कामे करावीत. याचे हमखास फळ मिळेलच. पक्ष मोठा झाला की आपण मोठे होणार आहेत. तुम्ही तुमच्या तयारीला लागा, हे करायचं, विधानसभेच्या पुढचे पुढं पाहू, इतके सगळे एकत्र जमलाय मग नगराध्यक्ष कोणाचा होईल? असे म्हणीत अप्रत्यक्ष नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीत स्वबळावर लढण्याचे संकेत दिले. ते कर्जत येथे "गाव तेथे काँग्रेस आणि वार्ड तेथे काँग्रेस" कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. 

यावेळी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, समनव्यक ज्ञानदेव वाफारे, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले व ॲड. कैलास शेवाळे, तालुकाध्यक्ष प्रा. किरण पाटील, कर्जत जामखेड युवक काँग्रेसचे अध्यक्ष नगरसेवक सचिन घुले, माणिकराव मोरे,दीपक पाटील, शहाजी भोसले, शंकरराव देशमुख, ज्योती गोळेकर, मीनाक्षी साळुंके, प्रतिभा भैलूमे, मोहिनी घुले उपस्थित होते.

ते म्हणाले कर्जत तालुका काँग्रेसचा बालेकिल्ला होता. माजी मंत्री आबासाहेब निंबाळकर, त्यानंतर विठ्ठल राव भैलूमे यांनी नेतृत्व केले. येथील आगामी नगरपंचायत निवडणुकीत सर्व प्रभागातील सर्वांना एकत्र आणण्याचा केलेला प्रयोग राज्यभरात राबविण्यात येईल. 

केंद्र सरकार सर्वच आघाड्यावर अपयशी ठरले असून त्यांनी दिशाभूल केली आहे. ते शेतकऱ्यांच्या विरोधी असून कांदा निर्यात बंदीचा निर्णय दुर्दैवी आहे. बाळासाहेब साळुंके म्हणाले, काँग्रेस पक्ष हा त्यागातून उभा राहिला असून निष्टेचे फळ हमखास मिळतेच. 
प्रवीण घुले म्हणाले, पक्ष अडचणीत असताना अनेक सोडून गेले. मात्र आपली निष्ठा कायम ठेवीत उर्जित अवस्था आणली. आगामी काळात काँग्रेसचे सुवर्णयुग अवतरेल.

प्रा. किरण पाटील म्हणाले राज्याचे नेते बाळासाहेब थोरात हे सुसंस्कृत नेतृत्व असून सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकत देण्याचे काम करीत उभे केले आहे. काँग्रेस संपला म्हणणारे संपले मात्र फिनिक्सप्रमाणे पुन्हा झेप घेत आसमंत कवेत घेणारा तो पक्ष आहे.
सचिन घुले म्हणाले, काँग्रेसकडे युवा वर्ग मोठ्या संख्येने आकर्षित होत असून त्यांना न्याय देणारा असल्याची खात्री पटली आहे,हे युवक इतिहास घडवतील. वाफारे, शेवाळे, शंकरराव देशमुख याची भाषणे झाली. भास्कर भैलूमे यांनी आभार मानले.

सचिन घुले यांच्यावर स्तुतीसुमने,,,,
कार्यक्रमाचे नेटके संयोजन,युवकांची समाधानकारक उपस्थिती आणि प्रभावी अभ्यासपूर्ण प्रास्ताविक केल्याबद्दल नगरसेवक सचीन घुले यांची मंत्री थोरात यांनी तोंडभरून स्तुती केली.

चार दादांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायतीच्या निवडणुकीत इतिहास घडविणार.
आमदार रोहित पवार, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके आणि माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले या चार दादांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायत निवडणुकीत इतिहास घडवू असे सचीन घुले यांनी निर्धार करताच टाळ्यांचा कडकडाट करीत उपस्थितांनी दाद दिली.

संपादन : अशोक मुरुमकर