esakal | राष्ट्रवादीचे आमदार पवार व भाजपचे खासदार डॉ. विखे म्हणतात मिले सुर मेरा तुम्हारा
sakal

बोलून बातमी शोधा

A meeting was held by MLA Rohit Pawar on the issue of main road in Karjat

कर्जत शहरातील मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम आता आठ महिने बंद राहील. यात विस्थापित होणाऱ्या सर्व गाळेधारकांचे पुनर्वसन करून नंतर रुंदीकरणाचे काम करण्यात येईल. 

राष्ट्रवादीचे आमदार पवार व भाजपचे खासदार डॉ. विखे म्हणतात मिले सुर मेरा तुम्हारा

sakal_logo
By
दत्ता उकीर्डे

राशीन (अहमदनगर) : कर्जत शहरातील मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम आता आठ महिने बंद राहील. यात विस्थापित होणाऱ्या सर्व गाळेधारकांचे पुनर्वसन करून नंतर रुंदीकरणाचे काम करण्यात येईल. त्यामुळे व्यापारी बांधवांनी आता निश्‍चिंत राहावे, असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले. दरम्यान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी गाळेधारकांबाबत घेतलेली भूमिकाही योग्य आहे. आम्ही दोघे एकाच विचाराने काम करीत असल्याने अडचण राहणार नाही, असेही पवार या वेळी म्हणाले. 

नगरमधील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
कर्जतमधील गाळेधारकांच्या प्रश्‍नाबाबत भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे व राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या भूमिकेवरुन ‘मिले सुर मेरा तुम्हारा...’ अशी स्थिती झाली आहे. कर्जत येथे व्यापारी संघटना व आमदार रोहित पवार यांच्या झालेल्या बैठकीत पवार बोलत होते. व्यापारी संघटनेचे अध्यक्ष गणेश जेवरे, उपाध्यक्ष विष्णुपंत नेटके व दीपक शिंदे, सचिव अण्णासाहेब म्हस्के, प्रवीण घुले, संतोष मेहत्रे, सचिन सोनमाळी, सुनील शेलार, भास्कर भैलुमे, भालचंद्र कुलथे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता अमित निमकर, मुख्याधिकारी गोविंद जाधव, समाधान पाटील यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. 

या वेळी गणेश जेवरे म्हणाले, कोरोना संकटामुळे व्यावसायिक आर्थिक संकटात आहेत. त्यात अमरापूर- बारामती रस्त्याच्या रुंदीकरणामुळे 99 गाळेधारक विस्थापित होत आहेत. शहरात रस्तादुभाजक, फूटपाथ व ड्रेनेजचे काम करताना अंतर कमी करावे, ड्रेनेजवरच फूटपाथ करावा, मेन रोड "नो पार्किंग झोन' करावा.'' 

आमदार पवार म्हणाले, व्यापारी संघटनेने रस्त्याचा प्रश्न अतिशय व्यवस्थित मांडल्यामुळे त्यांना न्याय मिळवून देईन. सर्व व्यापारी बांधवांना विश्वासात घेऊन, त्यांचा सल्ला व योजना, नियोजनावरच भविष्यातदेखील काम करायचे आहे. यामध्ये कोणतेही राजकारण आणू नये.'' विष्णू नेटके यांनी आभार मानले. 

संपादन : अशोक मुरुमकर