नगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत एवढे दिग्गज का उतरलेत, असं काय आहे तिथे

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 23 January 2021

जिल्हा बॅंकेसाठी 20 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. सध्या उमेदवारी अर्जांची विक्री व दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दिवसभरात 184 उमेदवारी अर्जांची विक्री झाली.

नगर ः जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दिवसभरात शुक्रवारी एकूण 164 अर्जांची विक्री झाली.

माजी आमदार चंद्रशेखर घुले, माजी आमदार शिवाजी कर्डिले, माजी आमदार भानुदास मुरकुटे, पांडुरंग अभंग आदी दिग्गज नेत्यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. नगर जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती मजबूत आहे. राज्यातील इतर जिल्हा बँका गटांगळ्या खात असताना एडीसीसीने नावलौकिक मिळवला आहे. त्यामुळे ही बँक आपल्या ताब्यात असावी असं राजकीय नेत्यांना वाटते. त्यामुळेच दिग्गज नेते निवडणुकीत उतरले आहेत.

हेही वाचा - शेतकऱ्यांसाठी अण्णांचे करेंगे या मरेंगे

जिल्हा बॅंकेसाठी 20 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. सध्या उमेदवारी अर्जांची विक्री व दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दिवसभरात 184 उमेदवारी अर्जांची विक्री झाली. अनेक दिग्गजांनी आपले अर्ज दाखल केले. यामध्ये काहींनी सर्वसाधारण मतदारसंघासह बिगरशेती, इतर मागासवर्गामध्ये अर्ज दाखल केले.

दिवसभरात अकोले, जामखेड, संगमनेर, नेवासे या तीन मतदारसंघांत एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. इतर मागास वर्गामध्ये सर्वाधिक दहा उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, त्याखालोखाल शेतीपूरकमध्ये आठ जणांनी दहा उमेदवारी अर्ज दाखल केले. 

मतदारसंघनिहाय दाखल उमेदवारी अर्ज ः 
कर्जत ः कैलास शेवाळे, नगर ः शिवाजी कर्डिले (पाच), पद्मावती म्हस्के, पारनेर ः नीलेश लंके (दोन), उदय शेळके, सुजित पाटील, पाथर्डी ः मोनिका राजळे (दोन), मथुराबाई वाघ, राहाता ः अण्णासाहेब म्हस्के (दोन), राहुरी ः अरुण तनपुरे, सुरेश बानकर, तानाजी धसाळ, शेवगाव ः चंद्रशेखर घुले (दोन), श्रीगोंदे ः राजेंद्र नागवडे, श्रीरामपूर ः भानुदास मुरकुटे (दोन), दीपक पटारे (दोन).

शेतीपूरक ः मधुकर नवले, भानुदास मुरकुटे, रोहिदास कर्डिले, रावसाहेब शेळके (दोन), तानाजी धसाळ, सुरेश पठारे, राजेंद्र नागवडे (दोन), गणपत सांगळे. बिगरशेती ः मधुकर नवले, भानुदास मुरकुटे, रवींद्र बोरावके, श्‍यामराव निमसे, शिवाजी डौले, पांडुरंग अभंग, सुवर्णा सोनवणे, सचिव गुजर. महिला राखीव ः आशा तापकीर, जयश्री औटी, सुप्रिया पाटील, पद्मावती म्हस्के, सुवर्णा सोनवणे.

अनुसूचित जाती-जमाती ः नंदकुमार डोळस. इतर मागास वर्ग ः काकासाहेब तापकीर (दोन), भानुदास मुरकुटे, रोहिदास कर्डिले, सुरेश करपे, रवींद्र बोरावके, पांडुरंग अभंग, भगवान फुलसौंदर, अनिल शिरसाठ, तानाजी धसाळ, कैलास शेवाळे, दीपक पटारे, केशव बेरड, सचिन गुजर, अरुण पानसंबळ. विमुक्त जाती-भटक्‍या जमाती ः आशिष बिडगर, अभय आव्हाड, गणपत सांगळे. 

शिवाजी कर्डिलेंचे शक्तिप्रदर्शन 

अर्ज भरताना शिवाजी कर्डिले यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. गेल्या दोन निवडणुकांत ते बिनविरोध निवडून आले होते. या वर्षीही आपल्याकडे शंभर सेवा संस्थांचे ठराव असून, केवळ बिनविरोध होऊ द्यायचे नाही म्हणून उमेदवार देऊन विरोधकांचा केविलवाणा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी सांगितले. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prominent leader in Ahmednagar District Bank elections