

Father and daughter spreading awareness against nylon manja to prevent accidents and save lives.
Sakal
संगमनेर: ‘नायलॉन मांजा विकू नका...वापरूही नका,’ असा संदेश देत संगमनेर शहरात गेल्या दोन दिवसांपासून आदित्य घाटगे आणि त्यांची मुलगी यशस्विनी घाटगे दुचाकीवरून फिरत जनजागृती केली. मकरसंक्रांती निमित्त त्यांनी शहरातील विविध भागांत जाऊन नागरिक, दुकानदार, पतंग उडवणाऱ्या तरुणांना नायलॉन मांजाच्या दुष्परिणामांची माहिती दिली. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे शहरभरातून कौतुक होत आहे.