कोरोना संकट हटू दे, मिलिंद नार्वेकरांचे शनिदेवाला साकडे

विनायक दरंदले
Saturday, 2 January 2021

उदासी महाराज मठात नार्वेकर यांच्या हस्ते सपत्निक शांतीपाठ, संकल्प, गणेशपूजन, आवाहन करुन स्वयंभू शनिमूर्तीला जलस्नान, पंचामृतस्नान, तैलाभिषेक व महानैवद्य अर्पण करून आरती सोहळा करण्यात आला

सोनई : "राज्यावर आलेले कोरोनाचे संकट लवकर हटू दे,' अशी प्रार्थना करीत आज शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी शनिदेवाची पूजा केली. आज सायंकाळी स्वयंभू शनिमूर्तीचा अभिषेक, महापूजा व आरती सोहळा झाला. 

उदासी महाराज मठात नार्वेकर यांच्या हस्ते सपत्निक शांतीपाठ, संकल्प, गणेशपूजन, आवाहन करुन स्वयंभू शनिमूर्तीला जलस्नान, पंचामृतस्नान, तैलाभिषेक व महानैवद्य अर्पण करून आरती सोहळा करण्यात आला.

पुरोहित अशोक कुलकर्णी व डिगंबर जोशी यांनी पौरहित्य केले. उपस्थित भाविकांना या वेळी प्रसाद वाटप करण्यात आला. 

शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्यावतीने विश्वस्त अप्पासाहेब शेटे यांनी नार्वेकर यांचा सत्कार केला. या वेळी राजेंद्र गुगळे, विश्वस्त भागवत बानकर, माजी विश्वस्त योगेश बानकर उपस्थित होते. जनसंपर्क अधिकारी अनिल दरंदले यांनी देवस्थानच्या उपक्रमाची माहिती दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Milind Narvekar took darshan of God Shani