अहमदनगर जिल्ह्यात दुधाचे संकलन वाढले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Milk Dairy

अहमदनगर जिल्ह्यात दुधाचे संकलन वाढले

अहमदनगर - जिल्ह्यात दुधाचे संकलन मागील वर्षीच्या तुलनेत वाढले आहे. मागील वर्षी २७ लाख लिटरपर्यंत दुधाचे दैनंदिन संकलन होते. त्यात यंदा वाढ झालेली असून, जिल्ह्यातील दुधाचे रोज २९ लाख ३४ हजार लिटर संकलन होत आहे. गेल्या दोन वर्षांपासून चांगला पाऊस असल्याने उन्हाळी चारापिके वाढली आहेत. त्याचा परिणाम दुग्धोत्पादन वाढण्यात झाला आहे. जिल्ह्यात एकूण सहा लाख ५२ हजार ६६३ दुधाळ जनावरे आहेत. यामध्ये चार लाख ६८ हजार ४९२ संकरित गायी, ९५ हजार ७७२ देशी गायी व ८८ हजार ३९९ म्हशी आहेत. यामध्ये गायीच्या दुधाला सुमारे ३३, तर म्हशीच्या दुधाला ४२ रुपये प्रतिलिटर भाव मिळत आहे. भावात फॅटनुसार चढ-उतार सुरू आहे. घरपोच दुधाचे रतीब घालणारे गायीच्या दुधाला ४० ते ४५ व म्हशीच्या दुधाला ४० ते ५० रुपये लिटरप्रमाणे दूध घालत आहेत. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे आइस्क्रीम, लस्सी, ताक आदींना मागणी मोठी राहते. त्यामुळे दुधाला चांगली मागणी वाढली आहे. त्याचा परिणाम भावावर होत आहे.

दूधवाढीला हेही एक कारण

गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात चांगला पाऊस आहे. त्यामुळे उन्हाळी चारापिके मोठ्या प्रमाणात घेतली जात आहे. विशेषतः मुरघास, ऊस, मका हा चारा उन्हाळ्यात केला जात आहे. कमी पावसामुळे पूर्वी तो फक्त पावसाळ्यात मिळत होता. उन्हाळी चारा वाढल्याने जिल्ह्यात दूधउत्पादनात वाढ झालेली आहे.

दैनंदिन दूधसंकलन (लिटरमध्ये)

सहकार :५ लाख ७७ हजार

खासगी :२३ लाख ५७ हजार

एकूण : २९ लाख ३४ हजार

राज्यांतर्गत आवक

सहकार : ६८ हजार

खासगी : दहा लाख ९७ हजार

एकूण : ११ लाख ६५ हजार

वापर व विनियोग

पिशवीबंद दूधविक्री

सहकार : २ लाख १ हजार

खासगी : २ लाख ३३ हजार

एकूण : ५ लाख ४३ हजार

ठोक विक्री

सहकार : १ लाख ७५ हजार

खासगी : २१ लाख १८ हजार

एकूण : २२ लाख १८ हजार

राज्याबाहेरील विक्री

सहकार : ४२ हजार

एकूण :४२ हजार

दुग्धजन्य पदार्थांचा वापर

सहकार : १ लाख २ हजार

खासगी : ३ लाख ५९ हजार

एकूण : ४ लाख ६१ हजार

प्रक्रिया पदार्थांसाठी वापर

सहकार : ७१ हजार

खासगी : सहा लाख ४५ हजार

एकूण : सात लाख १६ हजार

सहकार ते महानंद : ४४ हजार

एकूण विनियोग : ४० लाख ९९ हजार

Web Title: Milk Collection Increased In Ahmadnagar District

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top