esakal | दूध देणाऱ्या गाईला कारेगावमध्ये दूधाने अभिषेक
sakal

बोलून बातमी शोधा

Milking cow anointed with milk in Koregaon

दुधाला समाधानकारक दर न मिळाल्याने दुधउत्पादकांसह भाजपा पदाधिकर्यांनी कारेगाव (ता. श्रीरामपूर) येथे आज दुध देणाऱ्या गाईलाच दुधाने आंघोळ घालुन आंदोलन केले. 

दूध देणाऱ्या गाईला कारेगावमध्ये दूधाने अभिषेक

sakal_logo
By
गौरव साळुंके

श्रीरामपूर (अहमदनगर) : दुधाला समाधानकारक दर न मिळाल्याने दुधउत्पादकांसह भाजपा पदाधिकर्यांनी कारेगाव (ता. श्रीरामपूर) येथे आज दुध देणाऱ्या गाईलाच दुधाने आंघोळ घालुन आंदोलन केले. 

कोरोनामुळे शेतकरी मोडला असुन दोन पैसे देणारा दुध व्यवसाय अडचणीत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीचा सामना करत असुन दुधदरवाढीसाठी राज्यभर आंदोलन सुरु आहे. दुधदरवाढीबाबत सरकारने तात्काळ योग्य निणर्य घ्यावा, अन्यथा शेतकरी शांत बसणार नाही, असा इशारा शेतकर्यांनी दिला.

दुधदरवाढीसाठी आज पुकारलेल्या आंदोलनाचे पडसाद तालुक्यातील टाकळीभान, मुठेवाडगाव, कारेगाव, गोंडेगाव, निमगावखैरी, पढेगावसह ४३ गावात उमटले. आंदोलनात माजी सभापती दीपक पटारे, शेतकरी संघटनेचे सुभाष पटारे, सरपंच राजेंद्र पटारे, जालिंदर होले, सतीष पटारे, कैलास पटारे, राजेंद्र उंडे यांच्यासह दुधउत्पादकांनी सहभाग नोंदविला. कारेगाव येथे भाजपा कार्यकर्यांनी आज सकाळी गायीला दुधाभिषेक घालुन दुधदरवाढीसाठी संताप व्यक्त केला. आंदोलकांनी पहाटे दुध काढुन संकलन केंद्रात जमा न करता परिसरातील गरजुंना वाटप करण्याचा निर्णय घेतला. दुधदरवाढीसाठी रस्त्यावर येवुन घोषणाबाजी करत आक्रोश व्यक्त केला.

दुधाला सरासरी ३० रुपये दर मिळावा, दुध उत्पादकांना प्रतिलिटर दहा रुपये अनुदान द्यावेत, दूध भुकटी निर्मितीसाठी ५० रुपये अनुदान मिळाले अशा प्रमुख मागण्यासह विविध मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत. दुधदरवाढीसाठी प्रातांधिकारी अनिल पवार यांना निवेदन देवुन भाजपा तालुकाध्यक्ष सुनिल वाणी, सरचिटणीस सतिश सौदागर, विशाल अंभोरे, विजय लांडे यांनी आंदोलनात सहभाग घेतला.

संपादन : अशोक मुरुमकर

loading image