esakal | कामगारांचे प्रश्‍न मार्गी लागणार; वळसे पाटीलांचे आश्‍वासन
sakal

बोलून बातमी शोधा

Minister Dilip Walse Patil's assurance to solve worker problems

शासकीय यंत्रणा निष्क्रीय असल्याने सहकार्य मिळत नसल्याच्या तक्रारीची कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी तातडीने दखल घेवून राज्याचे कामगार आयुक्त श्रीरंग यांना लक्ष घालून नगर जिल्ह्यातील कामगारांचे नुतणीकरण व नोदंणी तातडीने करण्याचे अश्वासन दिले.

कामगारांचे प्रश्‍न मार्गी लागणार; वळसे पाटीलांचे आश्‍वासन

sakal_logo
By
सुनील गर्जे

नेवासे (अहमदनगर) : अगोदरच अनेक अडचणींनी घेरलेल्या असंघटीत बांधकाम कामगारांना कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सवलती देण्याची घोषणा केली. मात्र शासकीय यंत्रणा निष्क्रीय असल्याने सहकार्य मिळत नसल्याच्या तक्रारीची कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी तातडीने दखल घेवून राज्याचे कामगार आयुक्त श्रीरंग यांना लक्ष घालून नगर जिल्ह्यातील कामगारांचे नुतणीकरण व नोदंणी तातडीने करण्याचे अश्वासन दिले.

समर्पण मजदूर संघाचे अध्यक्ष डॅा. करणसिंह घुले यांनी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे या कामगारांच्या हेळसांडीची व अडवणूकीची कैफीयत मांडली होती. तातडीने लक्ष घालण्याची मागणी त्यांनी केली होती. डॉ घुले यांनी केलेल्या मागणीत कोविडमुळे असामान्य परीस्थिती उद्भवली आहे ती तर सर्वश्रृत आहे. या पार्श्वभुमीवर आपण दोन हजार रूपयांचे अर्थ सहाय्य नोंदित बांधकाम कामगारांना देऊ केले आहे. आता मार्च अखेर नोंदणीकृत बांधकाम कामगारांना तीन हजार रूपये देण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. 

कामगार कल्याण मंडळाकडे पाठपुरावा करुन देखील कामगरांच्या पदरात फारसे काही मिळत नसल्याने बांधकाम कामगार हे नुतनीकरण करण्यास अनुत्सुक असतात. आता नव्याने आलेल्या या योजनेत अटी शर्ती आहेतच. 

दोन हजारासाठी जानेवारी 2020 ला नुतनीकरण हवे तर तीन हजार रुपये करता मार्च 2020 ला नुतनीकरण हवे. सध्या नगरचे सहाय्यक कामगार आयुक्त हे नुतनीकरण ऑनलाईन करा असे सांगतात. परंतु त्यासाठी आवश्यक असलेले पाठबळ मात्र देत नाहीत. 

नोंदणीसाठी ना आयडी, ना पासवर्ड दिला जात नाही. मग मजुरांचे नुतनीकरण होणे अशक्य असल्याने त्यांना या योजनेचा फ़ायदाही मिळणे अवघड झाले आहे. हीच अवस्था नविन नोंदणीची आहे. या संदर्भात अनेकदा कामगार कार्यालयाकडे पाठपुरावा करूनही पदरी निराशाच येत असल्याने अशीच अनास्था व तांत्रिक अडचणी कार्यालयाकडुन सुरु राहिल्यास कामगारांचे कल्याण कसे साध्य होईल? हा प्रश्न उपस्थित करून त्यामुळे या गंभीर प्रश्नात आपण लक्ष घालून असंघटीत कामगारांनी न्याय द्यावा अशी मागणी केली होती. 

दरम्यान मंत्री वळसे पाटील यांनी या मागणीची तातडीने दखल घेवून राज्याचे कामगार आयु्क्त श्रीरंग यांना लक्ष घालण्याच्या सुचना केल्या. आयुक्त श्रीरंग यांनी समर्पण मजदूर संघाचे अध्यक्ष डॅा. करणसिंह घुले यांच्याशी संपर्क साधून नगर कार्यालयाला सुचना दिलेल्या असून तातडीने कामगारांची नोदंणी प्रक्रीया पु्र्ण केली जाणार असल्याचे सांगितले. 

समर्पण मजदूर संघाचे अध्यक्ष डॉ. करणसिंह घुले म्हणाले, मंत्री दिलीपवळसे पाटील यांचा मंत्रालयीन कामकाजाचा अनुभव मोठा असल्याने, त्याचा उपयोग केवळ नगर जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील कामगारांना नक्कीच होणार आहे.

संपादन : अशोक मुरुमकर