मंत्री गडाखांमुळे हटली शनिशिंगणापूरची "राजकीय साडेसाती"

विनायक दरंदले
Friday, 25 December 2020

घरांना दरवाजे व कडी कुलुपाचा वापर होत नसलेल्या या गावात देवस्थान विश्वस्त व ग्रामपंचायत पदाधिका-यात अनेक वर्षापासून टोकाचे राजकारण
चालत होते.

सोनई (जि.अहमदनगर) : मुलखावेगळ्या शनिशिंगणापुर गावात गेल्या अनेक वर्षापासून देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायत पदाधिका-यात असलेल्या राजकिय संघर्षाची साडेसाती जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या प्रयत्नातून हटली आहे.या 'एकोपा एक्सप्रेस'चे परीसरात स्वागत होत आहे.

घरांना दरवाजे व कडी कुलुपाचा वापर होत नसलेल्या या गावात देवस्थान विश्वस्त व ग्रामपंचायत पदाधिका-यात अनेक वर्षापासून टोकाचे राजकारण
चालत होते. गावातील सर्वच प्रमुख पुढारी एकमेकांचे नातेवाईक असतानाही दोन्ही संस्थेतील खुर्ची नेहमीच कळीचा मुद्दा ठरत आलेली आहे. येथील सेवा संस्था व ग्रामपंचायतीची निवडणूक नेहमीच गाजली. मात्र दोन्ही संस्थेवर बापुसाहेब शेटे यांचेच राज राहिलेले आहे.

हेही वाचा - आता एका क्लिकवर मिळणार शेतकऱ्यांना सर्व लाभ

शनिशिंगणापुर गाव लहान असले तरी तालुक्यातील निवडणूकांत याच गावाची चर्चा अधिक होत होती. गाव व परीसरातील विकास काम डोळ्यासमोर ठेवून
जलसंधारण मंत्री गडाखांनी कट्टर विरोध बाजला ठेवत ग्रामपंचायत गटप्रमुख बापसाहेब शेटे यांना मुळा कारखान्याच्या संचालक मंडळात संधी देत दोन्ही गटात समझोता घडवून आणला.गेल्या अनेक वर्षापासून गावात असलेले दोन राजकिय गट आता एका छताखाली आल्याने समाधान व्यक्त होत आहे.

मिले सुर मेरा- तुम्हारा
शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या पंचावन्न वर्षाच्या इतिहासात प्रथमच गावातील सर्व आडनावाच्या व्यक्तींना नवीन विश्वस्त मंडळात संधी देण्यात आल्याने
मंत्री गडाखांचे कौतुक होत आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister Gadakh gives political place to people from all walks of life