esakal | मंत्र्यांचा साधेपणा राहुरीकरांना भावला; मंत्री तनपुरेंनी लुटला खरेदीचा आनंद
sakal

बोलून बातमी शोधा

Minister Prajakt Tanpure bought in the market of Kelly Rahuri

"हम जहॉं खडे होते हैं, लाइन वही से शुरू होती हैं' या सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या "डायलॉग'चा अनुभव सध्या राहुरीकर घेत आहेत.

मंत्र्यांचा साधेपणा राहुरीकरांना भावला; मंत्री तनपुरेंनी लुटला खरेदीचा आनंद

sakal_logo
By
विलास कुलकर्णी

राहुरी (अहमदनगर) : "हम जहॉं खडे होते हैं, लाइन वही से शुरू होती हैं' या सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या "डायलॉग'चा अनुभव सध्या राहुरीकर घेत आहेत.

नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे राहुरी शहरात पायी फिरताना रस्त्यावर, चहाच्या टपरीवर, एखाद्या दुकानात, नागरिकांच्या गराड्यात जागेवर समस्या सोडविताना दिसतात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आज त्यांनी सपत्नीक राहुरीच्या बाजारपेठेत खरेदीचा आनंद घेतला. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
मंत्री तनपुरे कुठलाही बडेजाव न करता शहरात फिरून, सामान्य नागरिकांमध्ये मिसळून जातात. त्यामुळे जनतेमध्ये त्यांच्याविषयी आकर्षण निर्माण होत आहे. विशेषत: बाहेरगावांहून समस्या घेऊन भेटायला आलेल्या जनतेला, लवाजमा नसलेले मंत्री भेटल्यावर आश्‍चर्याचा धक्का बसतो. मंत्री तनपुरे रस्त्याने चालताना भोवती जनतेचा गराडा पडतो. राहुरीचे नगराध्यक्ष असताना त्यांची कार्यपद्धती जनतेला भावली. आमदार झाले, मंत्रीही झाले, तरी त्यांच्या वागण्यात व कार्यपद्धतीत तसूभरही बदल झाला नाही. सामान्य जनता व मंत्री यांच्यातील अंतर कमी झाले नाही. 

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आज मंत्री तनपुरे व सोनाली तनपुरे या उभयतांनी शहरातील बाजारपेठेत फिरून खरेदी केली. कापड दुकानातून कपडे, छोट्या व्यावसायिकांकडून पणत्या व दिवाळीचे साहित्य खरेदी केले. त्यांना भेटलेल्या व्यापारी व नागरिकांना दिवाळी सणाच्या शुभेच्छा दिल्या. छोट्या व्यावसायिकांना व व्यापाऱ्यांकडे त्यांच्या व्यवसायाविषयी आस्थेने विचारपूस केली. कोरोना महामारी संपलेली नाही. मास्क, सॅनिटायझर यांचा वापर करावा, असे प्रबोधनही केले. 

संपादन : अशोक मुरुमकर