मंत्री प्राजक्त तनपुरेंनी राणेंना पुन्हा खिजवलं...त्यांच्याकडं लक्ष द्यायला आमच्याकडे वेळ नाही

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 मे 2020

""नीलेश राणे यांनी उत्तर देताना संसदीय भाषा वापरायला पाहिजे होती. ती त्यांच्यात दिसली नाही. एका विद्यमान आमदाराला असे बालणे त्यांना शोभत नाही.

नगर ः साखर उद्योगाला मदतीच्या मुद्यावरून माजी खासदार नीलेश राणे व राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांमध्ये सुरू झालेल्या ट्विटर वॉरमध्ये नगरविकासमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पुन्हा उडी घेतली होती. आमदार असलेल्या रोहित पवारांबद्दल बोलताना खासदार राहिलेल्या नीलेश राणेंनी बोलण्याचे ताळतंत्र सोडले होते. त्यांच्या बोलण्यात काही तरी संसदीय भाषा असेल, असे वाटले होते. परंतु, त्यांची शब्दप्रयोगाची पातळी अोलांडली. लहान मुलांना वाटते की, आपण अपशब्द बोलून काहीतरी पराक्रम केला. त्यामुळे अशा लहान मुलांकडे दुर्लक्ष केलेले बरे, असा टोला नगर विकास खात्याचे राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी लगावला. 

जाणून घ्या - कोरोनाबाधित महिलेला झालं जुळं

जिल्हाधिकारी कार्यालयात आज (गुरुवार) खरीप हंगाम नियोजनाची बैठक पार पडली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना तनपुरे म्हणाले, ""नीलेश राणे यांनी उत्तर देताना संसदीय भाषा वापरायला पाहिजे होती. ती त्यांच्यात दिसली नाही. एका विद्यमान आमदाराला असे बालणे त्यांना शोभत नाही. त्यामुळे त्यांना चांगलाच उपदेश दिला आहे. कार्यकर्त्यांनाही सांगितले आहे, की लहान मुलाकडे दुर्लक्ष करा. कोरोनाच्या संकटाच्या काळात राणे माझ्याबद्दल काय बोलले, या बाबतीत मला दखल घ्यायला वेळ नाही, असं म्हणून राणेंना पुन्हा एकदा खिजवलं.

हेही वाचा - पखवाज्या कीर्तनातून पळाला, असा काय केला होता त्याने तमाशा

दरम्यान, तनपुरे नीलेश राणे यांना थेट इशारा देताना म्हटले होते, की पवार घराणे अत्यंत अभ्यासू, सुसंस्कृत आहेत. म्हणूनच राष्ट्रवादीतील कार्यकर्ते त्यांच्यावर मनापासून प्रेम करतात. टप्प्यात आल्यावर साहेब कार्यक्रम करतात.तनपुरे यांचे हे ट्विट राणे यांना जिव्हारी लागले होते. त्यानंतरही त्यांनी शिवराळ भाषा वापरून तनपुरे व राष्ट्रवादीला घायाळ केलं होतं. 

महाविद्यालयांच्या अंतिम परीक्षासंदर्भात बैठक झाली. त्यात कोरोनामध्ये काय सुधारणा होईल, तसेच विद्यार्थांचे आरोग्य, त्यांच्या पुढच्या भविष्यातील करियरचा विचार करून निर्णय घेतला जाईल,'' असेही तनपुरे म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister Prajakt Tanpure criticizes Nilesh Rane