मंत्री प्राजक्त तनपुरे कोरोना पॉझिटिव्ह, ट्विट करून दिली माहिती

Minister Prajakta Tanpure Corona Positive
Minister Prajakta Tanpure Corona Positive
Updated on

राहुरी : महाविकास आघाडी सरकारमधील तरुण चेहरा असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आज (सोमवारी) कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे त्यांना अधिवेशनात भाग घेता आला नाही.

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सर्व आमदारांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये मंत्री तनपुरे कोरोना बाधित झाल्याचे आढळले. तनपुरे यांनी स्वत: ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. 'सतत फिल्डवर आहे. लोकांच्या संपर्कात आहे. पुरेशी काळजी घेत होतो. मात्र, कितीही बचाव केला. तरी शेवटी काल केलेल्या करोना चाचणीत रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तब्येत अगदी व्यवस्थित आहे. काळजी करण्याचे कारण नाही. मी स्वतः काळजी घेत आहे. आपणही स्वतःची काळजी घ्या. कोरोनाला हरवून लकवरच तुमच्या सेवेत पुन्हा रूजू होणार.' असे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

मंत्री तनपुरे यांनी कोरोना काळात मतदार संघात, नगर जिल्ह्यात व राज्यभर दौरे केले. निसर्ग चक्रीवादळात रायगड व रत्नागिरी जिल्ह्याचे दौरे करून, आपत्ती व्यवस्थापनाची यंत्रणा सक्रिय केली. चक्रीवादळामुळे खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन, नागरिकांना दिलासा दिला. अंतिम वर्ष परीक्षा विषयात त्यांनी सुरुवातीपासून लक्ष घालून विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.  ऐन अधिवेशानाच्या दिवशी करोनाची लागण झाल्याचे आढळून आल्याने त्यांना अधिवेशनात भाग घेता आला नाही.

राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांना आतापर्यंत करोनाची लागण झाली आहे.  गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना सर्वात अगोदर कोरोनाची लागण झाली होती. नंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, अस्लम शेख यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला. सर्वांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली. आता राज्यमंत्री तनपुरे यांच्यासह अनेक आजी माजी आमदार यांना कोरोनाने गाठले आहे.

संपादन -  अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com