नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे फेसबुक पेज हॅक

विलास कुलकर्णी
Wednesday, 12 August 2020

माझे अधिकृत फेसबुक पेज (prajakt prasadrao tanpure) हॅक झाले आहे. मी पोलिसांत फिर्याद दाखल करत आहे.

राहुरी (अहमदनगर) : माझे अधिकृत फेसबुक पेज (prajakt prasadrao tanpure) हॅक झाले आहे. मी पोलिसांत फिर्याद दाखल करत आहे. कृपया त्या पेज वरून काही चुकीच्या पोस्ट पडल्यास त्याची माझी पोस्ट म्हणून कोणी दखल घेऊ नये, असे आवाहन नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले.
 

सोमवारी रात्री पावणे १० वाजता राज्यमंत्री तनपुरे यांनी फेसबुक पेज हॅक झाल्याचे जाहीर केले. मंत्री तनपुरे सोशल मीडियावर कायम ॲक्टिव्ह असतात.

व्हॉट्स ॲप, फेसबुक, ट्विटर यावर त्यांचे बारीक लक्ष असते. सोशल मीडियाद्वारे जनतेने मांडलेल्या प्रश्नांनी दखल घेण्यात ते अग्रेसर असतात. तरुण, अभ्यासू व सतत कार्यमग्न असल्याने अल्पावधीत त्यांनी सोशल मीडियाद्वारे राज्यात व देशभरात मोठा मित्रपरिवार गोळा केला आहे.

त्यांच्याकडे नगरविकास, ऊर्जा, उच्च व तंत्रशिक्षण, आदिवासी विकास, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन या खात्यांचे राज्यमंत्री पद आहे. हॅकरने थेट मंत्र्यांचे फेसबुक हॅक केल्याने, आता पोलिसांना हॅकरचा शोध घ्यावा लागणार आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister of State for Urban Development Prajakt Tanpure Facebook page hacked