जनतेला दिलेला शब्द पाळणार : मंत्री तनपुरे

विलास कुलकर्णी 
Friday, 22 January 2021

मंत्री तनपुरे म्हणाले, की पालिका निवडणुकीत जनतेने नगराध्यक्षपदी विजयी केले. परंतु, भाजप सरकारच्या काळात निधी मिळण्यात समस्या येत होत्या.

राहुरी (अहमदनगर) : राहुरी शहराचा कायापालट करण्यासाठी, अंतर्गत रस्ते व गटार योजनेसाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सुधारित पाणी योजना, जॉगिंग ट्रॅकसह विविध कामे लवकरच पूर्ण केले जातील. पालिका निवडणूक काळात जनतेला दिलेला प्रत्येक शब्द पाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे, असे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.

अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 
 
पालिकेच्या विविध विकासकामांचा प्रारंभ मंत्री तनपुरे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. नगराध्यक्ष अनिता पोपळघट, उपनगराध्यक्ष सूर्यकांत भुजाडी, नगरसेवक दिलीप चौधरी, नंदकुमार तनपुरे, अनिल कासार, नितीन तनपुरे, अशोक आहेर आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

मंत्री तनपुरे म्हणाले, की पालिका निवडणुकीत जनतेने नगराध्यक्षपदी विजयी केले. परंतु, भाजप सरकारच्या काळात निधी मिळण्यात समस्या येत होत्या. आता महाविकास आघाडीचे सरकार असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व मंत्र्यांचे सहकार्य लाभत आहे. शहरातील कोट्यवधी रुपयांची विकासकामे मार्गी लागत आहेत. सुधारित पाणीयोजनेची 20 कोटींची निविदा नुकतीच प्रसिद्ध झाली. त्याचेही काम लवकरच सुरू होईल. जॉगिंग ट्रॅकसाठी दीड कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister of State for Urban Development Prajakt Tanpure has said that he is making sincere efforts to keep every word given to the people during the election period