
अहिल्यानगर : संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक, अकोले तालुक्यातील राजूर व नेवासे तालुक्यातील घोडेगाव येथे स्वतंत्र अपर तहसील कार्यालये प्रस्तावित आहेत. जनतेच्या सोयीसाठी या कार्यालयांची निर्मिती केली जात आहे. त्यातील आश्वी बुद्रुक येथील अपर तहसील कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या काही गावांतील जनतेची गैरसोय होत असेल, तर महसूल मंडळांची पुनर्रचना करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत. त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल, असे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी स्पष्ट केले.