esakal | अहमदनगर : 13 वर्षांच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार, गुन्हा दाखल | Crime News
sakal

बोलून बातमी शोधा

rime News

अहमदनगर : 13 वर्षांच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार, गुन्हा दाखल

sakal_logo
By
गोरक्षनाथ बांदल

अहमदनगर : शहरातील 13 वर्षांच्या मुलासोबत प्रौढ व्यक्तीने अनैसर्गिक कृत्य केल्याची घटनासमोर आली. आरोपीने लष्करी गणवेश परिधान केलेला होता. तोफखाना पोलिस ठाण्यात अनैसर्गिक अत्याचार आणि पोक्‍सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगर शहराच्या सावेडी उपनगरातील आठरे पाटील पब्लिक स्कूल रस्त्यावर बुधवारी (ता.13) ही घटना घडली आहे. 13 वर्षांचा हा अल्पवयीन पीडित मुलगा सायकलीवरून घराकडे चालला होता. त्यावेळी लष्करी गणवेश परिधान केलेल्या आणि रस्त्याने चाललेल्या या अनोळखी व्यक्तीने त्याला थांबविले. " मै आर्मीवाला हू,' असेही त्या व्यक्तीने सांगितले. येथील गॅरेजवर वाहन दुरुस्तीचे काम चालू असल्याचीही बतावणी केली. येथे लघुशंका करू शकतो का,' अशी विचारणा केल्यावर मुलाने "हो' म्हणून सांगितले. त्यावर लष्करी गणवेश परिधान केलेल्या त्या प्रौढ व्यक्तीने मुलाच्या हातातील सायकल हिसकावून घेत ती खाली पाडली आणि मुलाला रस्त्याकडेला असलेल्या काटवनात घेऊन गेला. तिथे त्या व्यक्तीने मुलाबरोबर अनैसर्गिक कृत्य केले. या प्रकाराची कोठे वाच्यता केल्यास मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर शंभर रुपये देत तेथून ही व्यक्ती पसार झाली, असे मुलाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. तोफखाना पोलिसांनी याप्रकरणी भा. दं. वि. कलम 377, अनैसर्गिक अत्याचार प्रतिबंधक तसेच लैंगिक गुन्हापासून बालकांच्या संरक्षण (पॉक्‍सो) कायद्यानुसार गुन्ह्याची नोंद केली आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, प्रभारी शहर पोलिस उपअधीक्षक अजित पाटील, पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी घटनास्थळी पाहणी केली. आरोपीच्या शोधासाठी पथक रवाना केले आहे.

हेही वाचा: अहमदनगर जिल्ह्यात सोयाबीनची नासाडी; शेंगांना फुटले कोंब

loading image
go to top