esakal | अहमदनगर जिल्ह्यात सोयाबीनची नासाडी; शेंगांना फुटले कोंब | Soybean Crop
sakal

बोलून बातमी शोधा

rains in the district have caused severe damage to soybean crop

अहमदनगर जिल्ह्यात सोयाबीनची नासाडी; शेंगांना फुटले कोंब

sakal_logo
By
प्रा. सुनील गर्जे

नेवासे (जि. अहमदनगर) : जिल्ह्यात यंदा सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली खरी. मात्र, गतवर्षीप्रमाणे यंदाही ऐन काढणीच्या काळात पिकांला फटका बसला आहे. सततच्या पावसामुळे बहुतांश ठिकाणी सोयाबीनच्या शेतांत पाणी साचलेले आहे. त्यामुळे सोयाबीन शेंगांना कोंब फुटले आहेत. पावसाने साधारण पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्राला फटका बसला आहे.

अहमदनगर जिल्ह्यात यंदा गतवर्षीपेक्षा जास्त, म्हणजे एक लाख १७ हजार ८२२ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. सरासरी ५४ हजार २९४ हेक्टर क्षेत्र असताना, यंदा सरासरीच्या २१७ टक्के पेरणी झाली. नगर, संगमनेर, अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता तालुक्यांत सोयाबीनचे क्षेत्र अधिक आहे. अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे यंदा सोयाबीनचे पीक जोमात होते. मात्र, ऐन काढणीच्या काळातच पावसाला सुरवात झाली. गेल्या महिनाभरापासून सतत पाऊस पडला. नगर, पारनेर, शेवगाव, पाथर्डी तालुक्यांसह अन्य भागांतही जोरदार पाऊस झाला आहे.

सध्या बहुतांश भागात सोयाबीन काढणीला आले आहे. मात्र, सततच्या पावसाने सोंगणी करता येईना. अनेक ठिकाणी सोयाबीनच्या शेतांत पाणी साचले आहे. शिवाय, सततच्या पावसामुळे शेंगांना कोंब फुटले आहेत. काही ठिकाणी सोयाबीन दाणे काळे पडले आहेत, तर काही ठिकाणी पूर्णतः सोयाबीन वाया गेले आहे.

हेही वाचा: राजू शेट्टी म्हणाले भाजप-महाआघाडी म्हणजे, 'चोर-चोर मावसभाऊ..'

कृषी विभाग बेफिकीर

जिल्ह्यात खरिपातील सोयाबीन, कापूस, कांदा, काही प्रमाणात बाजरी, मका, भाजीपाला पिकांचे पावसाने मोठे नुकसान झाले. या काळात कृषी विभागाने शेतकऱ्यांना धीर देण्याची गरज असते. मात्र, बहुतांश वरिष्ठ अधिकारी नुकसानीच्या ठिकाणी गेलेच नाहीत. केवळ बैठका घेण्याचा फार्स केला. त्यामुळे नुकसानीबाबत कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारीच किती बेफिकीर आहेत, हे दिसून येत आहे.

यंदा सततच्या पावसामुळे शेतांत पाणी साचल्याने सोयाबीनची काढणी करता येईना. सोयाबीनची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली.
- शरद डिके, जैनपूर, ता. नेवासे

अतिवृष्टीने सोयाबीन पिकाची पूर्णपणे वाताहत झाली आहे. नफा सोडा, झालेला
खर्चही निघेल असे वाटत नाही.
- घनश्याम शेळके, दुलेचांदगाव, ता. पाथर्डी

हेही वाचा: नोकियाचा सर्वात स्वस्त 5G फोन Nokia G300 लॉंच, पाहा किंमत

loading image
go to top