
राहुरी :अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या एका आरोपीला राहुरी पोलिसांनी ताब्यात घेतले. मुलीला तिच्या पालकांच्या स्वाधीन केले. प्रमोद ऊर्फ सनी शंकर साळवे (वय २१, रा. कणगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला राहुरी न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.