फक्राबादचा बेपत्ता मुलगा सापडला विहिरीत, सोशल मीडियात तर्क-वितर्क

Missing son of Fakrabad found in well
Missing son of Fakrabad found in well
Updated on

जामखेड : तालुक्‍यातील फक्राबाद येथून शुक्रवारपासून बेपत्ता असलेल्या संग्राम संतोष भोसले (वय 6) याचा मृतदेह त्यांच्याच घराजवळील विहिरीत आज आढळून आला.

फक्राबाद येथील संतोष भोसले यांचा सहा वर्षांचा मुलगा संग्राम शुक्रवारपासून बेपत्ता झाला होता. याबाबत सोशल मीडियावरही त्याचा फोटो व्हायरल झाला होता.

पोलिस पाटील योगीनाथ जायभाय यांनी पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड व तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना माहिती दिली. सर्वत्र शोध सुरू असताना, आज सकाळी घराजवळील कठडे नसलेल्या विहिरीत रज्जाक शेख यांना लहान मुलाच्या चपला पाण्यावर तरंगताना दिसल्या. त्यांनी ग्रामस्थांना माहिती दिली. त्यानंतर दोन वीजपंपाच्या साहाय्याने विहिरीतील पाणी उपसण्यात आले. त्यानंतर दोरीच्या साहाय्याने संग्रामचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. 

या बाबत तर्कवितर्क व्यक्त होत असले, तरी खेळताना तोल जाऊन तो विहिरीत पडला असावा, असा अंदाज आहे. अहमदनगर
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Farmers struggling with increased cost of cultivation in Ahmednagar district
Political Intervention in Akole: MLA Steps In to Stop Illegal Liquor Sales
Police Tighten Net Around Foeticide Network; Fresh Revelations Emerge After Arrest
Blood Ties Broken: Son Confesses to Killing Father in Ahmednagar District
Marathi News Esakal
www.esakal.com