
संगमनेर : पावसाळ्यात निसर्ग सौंदर्य खुलते. मात्र, पावसाळ्यात पर्यटनस्थळी अपघातांचे प्रमाणही वाढते. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आमदार अमोल खताळ यांनी याच वास्तवाकडे स्पष्ट, टप्प्याटप्प्याने लक्ष वेधत प्रशासनाची झोप उडवली. त्यांनी केवळ कुंडमळा पूल नव्हे, तर संपूर्ण राज्यातील धोकादायक स्थळांचा पाढाच सभागृहात वाचून दाखवला.