
कोपरगाव : मतदारसंघातील शेतकऱ्यांनी खरीप पिकांच्या पेरण्या केल्या आहेत; परंतु जून महिन्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत पडले. खरीप पिकांना पाण्याची गरज निर्माण झाल्याने गोदावरी कालव्यांतून तातडीने ओव्हर फ्लोचे पाणी सोडावे, अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली.