मका खरेदी केंद्रे पुन्हा सुरू होणार

मनोज जोशी
Thursday, 14 January 2021

काळे म्हणाले, शेतकऱ्यांची मका खरेदी करण्यापूर्वीच सरकारने केंद्रे बंद केली होती. कोपरगाव विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मक्‍याचे उत्पादन झाले. मात्र, सरकारी खरेदी केंद्रे अचानक बंद झाल्याने शेतकरी हतबल झाले होते.

कोपरगाव (अहमदनगर) : राज्यातील सर्व सरकारी मका खरेदी केंद्रे पुन्हा सुरू होतील. शेतकऱ्यांकडील सर्व 15 लाख 18 हजार क्विंटल मका येत्या 31 जानेवारीपर्यंत खरेदी केली जाईल, अशी माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली.

अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 
 
काळे म्हणाले, शेतकऱ्यांची मका खरेदी करण्यापूर्वीच सरकारने केंद्रे बंद केली होती. कोपरगाव विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मक्‍याचे उत्पादन झाले. मात्र, सरकारी खरेदी केंद्रे अचानक बंद झाल्याने शेतकरी हतबल झाले होते. किमान आधारभूत किंमत भरडधान्य योजनेंतर्गत खरीप हंगाम 2020-21 साठी राज्यातील शेतकऱ्यांची 15 लाख 18 हजार क्विंटल मका, तसेच 2 लाख 50 हजार क्विंटल ज्वारी व 60 हजार क्विंटल बाजरी राज्य सरकार खरेदी करणार आहे. याबाबत अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाला आदेश प्राप्त झाले आहेत. अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने कोपरगाव बाजार समितीला सूचना केली आहे. आता तातडीने मका खरेदी केंद्र सुरू होईल. खुल्या बाजारात मका, बाजरीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. त्यातून उत्पादनखर्चही निघत नाही. आता सरकारी खरेदी केंद्रे सुरू होणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकेल, असे काळे यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

सरकारी खरेदी केंद्रे सुरू करण्यासाठी सरकारदरबारी सातत्याने पाठपुरावा केला. अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्यासमोर कैफियत मांडली. त्यानंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे काळे म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Ashutosh Kale has informed that all government maize procurement centers in the state will be reopened