
श्रीरामपूर: शिक्षण विभागातील निकृष्ट पोषण आहार, मोडकळीस आलेल्या शाळा, रस्त्यांची दुर्दशा, आरोग्य सेवांचा ढासळलेला दर्जा, पाणीपुरवठा योजनांतील अनियमितता आणि शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारींच्या सततच्या चोऱ्या या सर्व विषयांनी आमसभा वादळी ठरली. अधिकारी बेपर्वाई करतील, तर गाठ माझ्याशी आहे. कारभार नीट करा; अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा सज्जड दम आमदार हेमंत ओगले यांनी अधिकाऱ्यांना यावेळी दिला.