
या बाबतची माहिती मिळताच आमदार संग्राम जगताप यांनी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
नगर ः लष्काराच्या अखत्यारीतील वाहन संशोधन व विकास संस्था (व्हीआरडीई) या संस्थेला आपण स्थलांतरीत होऊन देणार नाही, असे, आश्वासन आमदार संग्राम जगताप यांनी दिले.
येथील व्हीआरडीई स्थलांतरीत करण्याच्या हालचाली सुरु झालेल्या आहेत. त्यामुळे या संस्थेवर अवलंबून असलेल्या सुमारे दोन हजार कुटुंब उध्दवस्त होणार आहे.
या बाबतची माहिती मिळताच आमदार संग्राम जगताप यांनी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. या वेळी कर्मचाऱ्यांनी जगताप यांना ही संस्था इतरत्र हलवू देऊ नये, या मागणीचे निवेदन दिलेले आहे.
हेही वाचा - सुरज-हैदराबाद रस्ता शेतकऱ्यांना आणणार रस्त्यावर
या प्रसंगी एस. डब्लू पगारे, एम. एस पांढरे, एस. आर. वाघ, एस. एस. अहमद, डी. के. परदेशी, डी. डी. गाडेकर आदी उपस्थित होते.
जगताप म्हणाले की, व्हीआरडीई ही संरक्षण संस्था दुसरीकडे स्थलांतरित करण्याच्या निर्णयाला स्थगिती मिळविण्याबाबत जातीने लक्ष घालून सरकारी दरबारी पाठपुरावा करणार आहे. या प्रश्नासंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करणार आहे. या संदर्भातचे बोलणे त्यांच्याशी झालेले आहे, असे ते म्हणाले.
संपादन - अशोक निंबाळकर