
निधी असूनही कामे रखडता कामा नयेत. जनतेला दिलेली विकासाची आश्वासने पूर्ण व्हावीत. ठेकेदारांनी कामे व पदाधिकाऱ्यांनी ती पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करावा, अशा सुचना आमदार मोनिका राजळे यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना केल्या.
पाथर्डी (अहमदनगर) : शहरातील नगरपालिकेची सुरु असलेली विकास कामे दोन महिन्यात तातडीने पूर्ण करा. जॉंगिंगपार्क (कै.) माधवराव निऱ्हाळी सभागृह, रामगिरीबाबा टेकडी सुशोभीकरण, रस्ते, गटारी व पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ही कामे प्राधान्याने मार्गी लागावीत. निधी असूनही कामे रखडता कामा नयेत. जनतेला दिलेली विकासाची आश्वासने पूर्ण व्हावीत. ठेकेदारांनी कामे व पदाधिकाऱ्यांनी ती पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करावा, अशा सुचना आमदार मोनिका राजळे यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना केल्या.
हे ही वाचा : कोपरगावच्या पाण्याचा ताळेबंद सादर करा, जिल्हाधिकारी भोसलेंचे आवाहन
येथील व्हाईटहौस येथे पालिकेच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेवाळे, नगरसेविका मंगल कोकाटे, महेश बोरुडे, मुख्याधिकारी धनंजय कोळेकर उपस्थित होते. आमदार राजळे व पालिका पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी जॉंगिंगपार्क (कै.) माधवराव निऱ्हाळी सभागृह, रामगिरीबाबा टेकडी सुशोभीकरण या कामाला भेटी देऊन पाहणी केली. सुरु असलेली कोट्यावधींची कामे पूर्ण करा. पालिकेच्या नव्या पिण्याच्या पाणी योजनेला निधी मिळावा, यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे राजळे यांनी सांगितले. डॉ. मृत्युजय गर्जे यांनी आभार मानले.