दोन पुलांच्या कामासाठी सव्वासात कोटींचा निधी मंजूर

MLA Monica Rajale said that crores of rupees have been sanctioned for the work of two bridges.jpg
MLA Monica Rajale said that crores of rupees have been sanctioned for the work of two bridges.jpg
Updated on

शेवगाव (अहमदनगर ) : तालुक्‍यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सुरू झालेल्या मात्र सध्या रखडलेल्या दोन पुलांच्या कामासाठी 7 कोटी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, यामुळे या दळणवळण अधिक सोयीस्कर होणार असल्याची माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली. 

ग्रामविकास विभागामार्फत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत तालुक्‍यातील लोळेगाव ते वडुले बुद्रुक हा रस्ता पूर्ण झाला असून, ढोरा नदीवरील पुलाच्या कामाअभावी त्याचा वापर परिसरातील ग्रामस्थांना करता येत नव्हता. त्यामुळे या रस्त्यावरील ढोरा नदीपात्रावर 70 मीटर लांबीच्या पुलाच्या कामासाठी 4 कोटी 39 लाख रुपये, तसेच मुंगी- पिंगेवाडी रस्त्यावरील नंदिनी नदीवर 60 मीटर पुलाच्या कामासाठी 2 कोटी 81 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

या दोन्ही रस्त्यांवरील पुलांची रखडलेली कामे मार्गी लागल्याने दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध होतील. या माध्यमातून मतदारसंघातील ग्रामीण भाग पक्‍क्‍या रस्त्याने जोडला गेल्याने विकासाला चालना मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com