कोरोना पॉझिटिव्ह आमदार मोनिका राजळेंनी केले हे भावनिक आवाहन

MLA Monica Rajale's appeal to the workers
MLA Monica Rajale's appeal to the workers

पाथर्डी ः पाथर्डी-शेवगाव तालुक्याच्या आमदार मोनिका राजळे कोरोनाबाधित आढळल्यानंतर सर्वस्तरातून त्यांच्यासाठी प्रार्थना होत आहे. विशेषतः सोशल मीडियातून त्यांच्याविषयी काळजी व्यक्त केली जात होती. लवकर बरे व्हा, असा संदेश पाठविला जात आहे. सर्व मतदार व समर्थकांसाठी त्यांनी भावनिक पोस्ट केली आहे.

कोरोनाला कोणीही सहजपणे घेऊ नका. सर्व नियम पाळून स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्या. मला भेटण्यासाठी कोणीही येऊ नका. मी 14 दिवसांसाठी क्वारंटाइन आहे. तुमचे आशीर्वाद बळ देणारे आहेत, अशा शब्दांत आमदार मोनिका राजीव राजळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

पत्रकात राजळे यांनी म्हटले आहे, की आपला अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तत्काळ नगर येथे डॉक्‍टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेत आहे. माझी तब्येत चांगली आहे. सध्या कोणताही त्रास नाही. त्यामुळे कोणीही काळजी करू नये. हजारो मेसेज व फोन येत आहेत. आपल्या सर्वांचा स्नेह, प्रेम, हीच माझी ऊर्जा आहे. मतदारसंघातील सर्वांना नम्र विनंती, की कोरोनाला एवढे सहज घेऊ नका, स्वतःची काळजी घ्या, संसर्ग साखळी तोडण्यासाठीचे नियम पाळा. स्वतःचे व कुटुंबाचे आरोग्य सांभाळा. 

वैद्यकीय सल्ल्यानुसार किमान 14 दिवस किंवा पुढील कोरोना चाचणी निगेटिव्ह येईपर्यंत विलगीकरण व वैद्यकीय निगराणीखालीच राहावे लागेल. त्यामुळे वैद्यकीय सल्ल्यानुसार मला कोणाला भेटता येणार नाही किंवा कोणी मला सध्या भेटण्यासाठी येऊ नये. काही काम असेल, तर पाथर्डी व शेवगाव येथील कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन राजळे यांनी केले.

संपादन - अशोक निंबाळकर 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com