नगरचा आजचा कोरोनाबाधितांचा आकडा नक्कीच पोटात गोळा आणील

सकाळ वृत्तसेवा
Monday, 7 September 2020

दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ८६९ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३९५४ इतकी झाली आहे.

नगर: दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. हा आकडा आकडी आणणारा आहे. मार्च महिन्यात अवघा एक कोरोना रूग्ण आढळला होता. परंतु आता हा आकडा सत्तावीस हजारांकडे गेला आहे. जिल्ह्यातील तब्बल ४० टक्के गावे कोरोनाबाधित झाली आहेत. दररोज पाच-पन्नास बाधित आढळणारे आता तब्बल सातशे आठशे रूग्ण निघत आहेत. आज तर कमालच झाली.

जिल्ह्यात आज ३८० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २२ हजार १५० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८३.६४ टक्के इतके झाले आहे.

दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ८६९ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३९५४ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ३२९,  खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २४६ आणि अँटीजेन चाचणीत २९४ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ६३, संगमनेर ४९,  राहता ०३, पाथर्डी ०५, नगर ग्रामीण ३८, श्रीरामपूर १०, कॅंटोन्मेंट ०७, नेवासा ०५, श्रीगोंदा ४३, पारनेर ०८, अकोले  ३३, राहुरी ३२, कोपरगाव २६, जामखेड ०२, कर्जत ०५  अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २४६ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ११२, संगमनेर २०, राहाता २४,पाथर्डी ०१, नगर ग्रामीण १५, श्रीरामपुर २४, कॅंटोन्मेंट ०४, नेवासा ०६, श्रीगोंदा ०२,  पारनेर १५, अकोले ०१, राहुरी १६, कोपरगांव ०२, जामखेड ०२ आणि कर्जत ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

हेही वाचा - मंत्री प्राजक्त तनपुरे झाले कोरोना बाधित

अँटीजेन चाचणीत आज २९४ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा ८६, संगमनेर २३, राहाता २१, पाथर्डी ०६, नगर ग्रामीण १६, श्रीरामपूर १७, कॅंटोन्मेंट ०२, श्रीगोंदा १९, पारनेर १८, अकोले २७, राहुरी ०१, कोपरगाव ११, जामखेड १५ आणि कर्जत ३२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज ३८० रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये, मनपा ९८, संगमनेर २७, राहाता ३४, पाथर्डी ०८, नगर ग्रा.३९, श्रीरामपूर ३२, कॅंटोन्मेंट १३,  नेवासा ३२, श्रीगोंदा १५, पारनेर २१, अकोले १०, राहुरी १३, शेवगाव ०१,  कोपरगाव १६, जामखेड ०३, कर्जत १७ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या: २२१५०, उपचार सुरू असलेले रूग्ण:३९५४, मृत्यू:३७८, एकूण रूग्ण संख्या:२६४८२

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 900 corona patients in Ahmednagar on Monday

Tags
टॉपिकस
Topic Tags: