आमदार नीलेश लंकेंनी आणली अॉनलाईन शाळेची नवी आयडिया

अनिल चौधरी
मंगळवार, 14 जुलै 2020

सदर फ्लॅटफॉमच्या मदतीने शिक्षक आपला लेसन प्लान करून विद्यार्थ्यांच्या घरच्या स्मार्टफोनवर ब्रॉडकास्ट करू शकेल.

निघोज : पारनेरसारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थांना डिजीटल शिक्षणाची सोय व्हावी व मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळावे यासाठी आमदार नीलेश लंके यांच्या सहकार्याने टीच अँड लर्न फॉर्म होम ही संकल्पना राबविली जात आहे. पारनेर तालुक्यातील सुमारे सात हजार विद्यार्थांना याचा लाभ होणार अाहे. राज्याला दिशादर्शक ठरेल असा हा उपक्रम शिक्षकांनाही उपयोगी पडणार आहे.

कोरोना व्हायरसाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे 15 जूनपासून डिजिटली शाळा सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला. विद्यार्थ्यांचा लर्निंग प्रोग्रेस व युजेस ट्रॅकिंग करण्याचा कोणताही कॉमन प्लॅटफॉर्म उपलब्ध नसल्याने सध्या शिक्षक फ्री सोर्स असलेला डिजिटल कन्टेन्ट व्हाट्स अँपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवित आहेत. परंतु होम लर्निंगसाठी व्हाट्स अँप व इतर माध्यमातून विद्यार्थ्यांना पुरवविलेल्या डिजिटल रिसोर्सेस मधून विद्यार्थी खरंच शिकत आहेत का? हा प्रश्न मात्र अनुउत्तरीत आहे. 

हेही वाचा - कोरोनासोबत या साथींचाही धोका

ही गरज ओळखून टीच अँड लर्न फॉर्म होमसाठी पारनेरचे आमदार नीलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली तंत्रस्नेही शिक्षक संदीप गुंड यांच्या दीप फाउंडेशनने Online शाळा नावाचा अँड्रॉइड डिजिटल फ्लॅटफॉम तयार केला आहे. 
सदर फ्लॅटफॉमच्या मदतीने शिक्षक आपला लेसन प्लान करून विद्यार्थ्यांच्या घरच्या स्मार्टफोनवर ब्रॉडकास्ट करू शकेल तसेच विद्यार्थ्यांचा लर्निंग प्रोग्रेस व युजेस ट्रॅक करून विद्यार्थी शिकत असल्याचे अहवाल शिक्षकांना देता येतील.

सदर उपक्रमांतर्गत स्मार्ट फोन असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांला तसेच शिक्षकांना स्वतंत्र लॉगिन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.यासाठी मा.आमदार नीलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागामार्फत स्मार्ट फोन असणाऱ्या विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले अाहे. सर्वेक्षणानुसार तालुक्यात 7 हजार 192 विद्यार्थ्यांच्या पालकांकडे अँड्रॉइड स्मार्ट फोन आहेत.

Online शाळा अँप्लिकेशनमध्ये व्हिडिओ स्ट्रीमिंग / ब्रॉडकास्टिंगची सुविधा देण्यात आली आहे. शिक्षकांना आपल्या लॉगिनवर लेसन प्लॅन करून ब्रॉडकास्ट केलेला लेसन किती विद्यार्थ्यांनी अटेंड केला याचा अहवाल देता येतो. डिजिटल लायब्ररीमध्ये शिक्षकांनी ब्रॉडकास्ट केलेल्या लेसन संदर्भात दिलेले विविध डिजिटल लर्निंग रिसोर्सेस विद्यार्थी लॉगिनला ऍक्सेस करता येतात. असाइनमेंट, क्विजवर विद्यार्थ्यांनी दिलेल्या रिस्पॉन्सचे रिपोर्ट्स ऐड्मिन लॉगिनवर पाहता येतात. लंके यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन शिक्षणासाठी पारनेर तालुक्यात सुरू झालेला उपक्रम निश्चितच राज्याच्या शिक्षण विभागासाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरणार आहे. 

 

शिक्षण विभागाच्या सहकार्याने सदर उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी Online शाळा या अँप्लिकेशनच्या प्रत्यक्ष वापराबाबत प्रत्येक केंद्रातील दोन तंत्रस्नेही शिक्षकांना व सर्व केंद्रप्रमुख यांना नुकतेच प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण घेतलेले सदर तंत्रस्नेही शिक्षक आपल्या केंद्रातील सर्व शिक्षकांना प्रत्यक्ष वापरासंदर्भात प्रशिक्षण देणार अाहे. शाळा पातळीवर ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडे स्मार्टफोन आहे. त्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या स्मार्टफोनमध्ये सदर अॅप इन्स्टॉल करून त्याचा प्रत्यक्ष वापर याविषयी माहिती दिली जाईल.

संदीप गुंड, अध्यक्ष, 

दीप फौंडेशन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Nilesh Lanka brings new idea of ​​online school