esakal | हमाल माथाडी व श्रमजीवी कामगार संघटनेच्या राज्य समितीवर आमदार निलेश लंके यांची निवड

बोलून बातमी शोधा

MLA Nilesh Lanka has been elected to the state committee of Hamal Mathadi and Shramjivi Kamgar Sangh}

या समितीवर राज्यातील आठ आमदारांसह औद्योगिक व कामगार संघटनेच्या प्रतिनिधींचा समावेश आहे.

हमाल माथाडी व श्रमजीवी कामगार संघटनेच्या राज्य समितीवर आमदार निलेश लंके यांची निवड
sakal_logo
By
मार्तंड बुचुडे

पारनेर (अहमदनगर) : माथाडी हमाल व श्रमजीवी कामगार संघटनेच्या राज्य समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांची निवड झाली आहे.  राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या आदेशानुसार व सरकारच्या वतीने गुरुवारी (ता.25) उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे उपसचिव डॉ.श्रीकांत पुलकुंडवार ही निवड राजपत्रातून जाहीर केली आहे. या समितीवर राज्यातील आठ आमदारांसह औद्योगिक व कामगार संघटनेच्या प्रतिनिधींचा समावेश आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव परत वाढल्याने प्रकल्प पर्यटकांसाठी बंद

ही समिती माथाडी हमाल व श्रमजीवी कामगारांचे‌ प्रश्न व समस्या सोडवण्याचे काम करत असते. या सल्लागार समितीचे सचिव म्हणून सह कामगार आयुक्त (माथाडी कक्ष)‌ हे असणार आहेत. या सदस्यांमध्ये राज्याचे कामगार मंत्री, कामगार आयुक्त, यांच्या सह राज्य विधानमंडळाचे सदस्यांमध्ये आमदार भरत गोगावले, महेश शिंदे, अशोक ऊर्फ भाई जगताप, शशिकांत ज शिदे, निलेश लंके‌, संजय जगताप, श्रीनिवास वनगा, सरोज अहिरे ‌यांची निवड करण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

तर कंपनी मालकांचे प्रतिनिधीत्व करणारे सदस्य प्रशांत गिरबने (एमसीसीआया, पुणे) शिवनारायण ब्रदीनारायण सोमानी (नाशिक) रामचंद्र निलकंठ भोगले (औरंगाबाद), निरंजनलाल गुप्ता (बीजीटीए, मुंबई) अमृतलाल घीसुलालजी जैन (ग्रोमा, मुंबई) संजय कैलासचंद्र अग्रवाल, नागपूर सुदेश नागाप्या शेष्टी, मुंबई दत्तात्रय सर्जराव ढमाळ, सातारा यांचा सामावेश ‌आहे. तर कामगारांचे प्रतिनिधीत्व करणारे सदस्य, डॉ. बाबा आढाव (पुणे ), नरेंद्र  पाटील (नवी मुंबई ) गुलाबराव जगताप (ठाणे), दिलीप जगताप (नवी मुंबई), राजकुमार घायाळ (बीड), इरफान सय्यद (पुणे), संतोष शिंदे (मुंबई), सुभाष लोमटे (औरंगाबाद‌) यांचा समावेश करण्यात आला आहे.

कामगारांच्या अनेक समस्या आहेत. माथाडी हमाल व श्रमजीवी कामगार संघटनेच्या राज्य समितीच्या माध्यमातून कामगारांचे प्रश्न व समस्या सोडून त्यांना न्याय देण्याचे काम करणार. सरकारच्या विविध योजना कामगारांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार. 
- निलेश लंके, आमदार.