esakal | 'गवळींनी ट्रस्टची ७० कोटींची संंपत्ती पीएच्या नावावर केली'
sakal

बोलून बातमी शोधा

किरीट सोमय्या आणि भावना गवळी

'गवळींनी ट्रस्टची ७० कोटींची संंपत्ती पीएच्या नावावर केली'

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

नाशिक : माजी खासदार आणि भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात जोरदार आघाडी उघडली आहे. शिवसेनेच्या खासदार भावना गवळी (MP Bhavana gawali) यांनी महिला उत्कर्ष प्रतिष्ठान स्ट्रस्ट याचे परिवर्तन महिला उत्कर्ष प्रतिष्ठान प्रा. लि. परिवर्तन कंपनीत केलं ते करताना जे कागदपत्र वापरलेत त्यामध्ये सह्या खोट्या केल्याची तक्रार माझ्याकडे आली.

पुसद नागरी बँकेने एनओसी दिलं नाही, असं त्यांनी मला उत्तर पाठवलं चॅरिटी कमिशनरनी सांगीतलं की खोट्या पध्दतीने हे ट्रान्सफर केलं आहे. रजिस्टर ऑफ कंपनीज कडे मी तक्रार केली त्यांनी देखील हे मान्य केलं म्हणून भावना गवळी यांच्या या खोट्या व्यवहाराचा तपास व्हायला हवा अशी आमची मागणी असल्याचे सोमय्या म्हणाले. दरम्यान या ट्रस्टमध्ये ७० कोटींची ट्रस्टची असलेली संपत्ती भावना गवळी यांनी त्यांच्या पीए सईद खान याच्या नावे केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर देखील टीका केली आहे. अनिल परब यांनी रिसॉर्टबाबत ठाकरे सरकारच्या महसुल विभागाने माहीती लोकायुक्त भारत सरकार यांना कळवली आहे. हे बांधकाम गैर आहे असं घोषित केलं आहे. कोणतीही परवानगी न घेता बांधकाम केलं आहे. ५००० स्के फुट चं बांधकाम परवानगी होती. मात्र, १७००० स्के बांधकाम करण्यात आले. रिसॉर्ट बांधण्यासाठी पैसा कुठून आला? सचिन वाझेकडून आला का ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच अनिल परब यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी सोमय्या यांनी केली.

दरम्यान, आज शिवसेनेचे नेते अनिल परब आणि खासदार भावना गवळी यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. भावना गवळी यांच्या पाच शिक्षण संस्थांवर ईडीने छापेमारी केली. तसेच बालाजी पार्टीकल बोर्डमध्ये घोटाळा केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

हेही वाचा: रस्ता चुकल्याने गुजरातचे पर्यटक रात्रभर किल्ल्यावरच

हेही वाचा: अकरावीचे आठ हजार ८९६ प्रवेश निश्‍चित; आजपासून दुसरी फेरी

loading image
go to top