esakal | खर्डा येथे सत्तांतर, जामखेडमध्ये रोहित पवार झाले फॅक्टर
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Rohit Pawar got undisputed power..jpg

या जागांसाठी चुरशीची लढत झाली. यापैकी दहा जागा राष्ट्रवादीला मिळाल्या तर भाजपच्या पँनलला चार जागा मिळाल्या. यावेळी आमदार रोहित पवार व माजी मंत्री राम शिंदे यांनी येथील निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ वाढवून शुभारंभ केला.

खर्डा येथे सत्तांतर, जामखेडमध्ये रोहित पवार झाले फॅक्टर

sakal_logo
By
वसंत सानप

जामखेड (अहमदनगर) : आमदार रोहित पवार आणि माजी मंत्री राम शिंदे यांनी प्रतिष्ठेची केलेल्या खर्डा ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले आणि आमदार रोहित पवार यांच्या हाती निर्विवाद सत्ता मिळाली.

जामखेड तालुक्यातील प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या खर्डा ग्रामपंचायतीत १७ जागा असून येथे भाजपची सत्ता होती. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रवी सुरवसे यांच्या नेतृत्वाखालील पँनल निवडणूक रिंगणात उतरले होते. मात्र यावेळी त्यांना सत्तेपासून रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हासंघटक विजयसिंह गोलेकर यांनी समविचारी कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन ग्रामविकास आघाडीच्या माध्यमातून आवाहन दिले होते. पहिल्या टप्प्यात भाजपच्या पँनलच्या दोन जागा  बिनविरोध निघाल्या तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पँनलची एक जागा बिनविरोध झाली. त्यामुळे १४ जागांसाठी निवडणूक झाली.

या जागांसाठी चुरशीची लढत झाली. यापैकी दहा जागा राष्ट्रवादीला मिळाल्या तर भाजपच्या पँनलला चार जागा मिळाल्या. यावेळी आमदार रोहित पवार व माजी मंत्री राम शिंदे यांनी येथील निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ वाढवून शुभारंभ केला. बैठका, सभा, रँली झाल्या आणि निवडणुकीतील रंगत वाढली. दोन्ही निर्माण त्यांचे येथील निवडणुकीवर बारकाईने लक्ष होते. त्यामुळे निवडणुकीचे निकाल उत्कंठतावर्धक लागतील, असा राजकीय 'होरा' होता. अखेर ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले आणि भाजपच्या हातून राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता काढून घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे १० उमेदवार निवडून आले आणि एक बिनविरोध आलेला मिळून संख्याबळ ११ वर पोहचले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला खर्डा ग्रामपंचायतीत एकहाती सत्ता मिळाली.
 

loading image