कुस्तीची तयारी करता यावी म्हणून सोनालीने पत्र्याच्या शेडमध्येच उभारली तालीम

अशोक मुरुमकर
Wednesday, 2 September 2020

कोणत्याही परस्थितीचा बाव न करता जिद्द ठेऊन पुढे जाण्याचे ठरवले तर मार्ग निघतोच. तेव्हा मदतीचे आनेक हातही पुढे येतात. याचा प्रयत्य कर्जत तालुक्यातील कापरेवाडी येथील सोनाली कोंडींबा मंडलिक या कुस्तीपटुला आला आहे.

अहमदनगर : कोणत्याही परस्थितीचा बाव न करता जिद्द ठेऊन पुढे जाण्याचे ठरवले तर मार्ग निघतोच. तेव्हा मदतीचे आनेक हातही पुढे येतात. याचा प्रयत्य कर्जत तालुक्यातील कापरेवाडी येथील सोनाली कोंडींबा मंडलिक या कुस्तीपटुला आला आहे.

सोनालीच्या घरी आई- वडील, भाव व बहिण आहेत. ती म्हणाली, मला श्रींगोंदा येथे प्रशिक्षणासाठी जायचे आहे. मात्र, कोरोनामुळे प्रशिक्षण केंद्र बंद आहे. आता त्यात लॉकडाऊनमध्ये शिथीलता आल्याने मी लवकरच जाईल. नगर जिल्ह्यातील कापरेवाडी येथील सोनालीने ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत कुस्तीमध्ये दोनवेळा सुवर्णपदक मिळवले आहे. त्याशिवाय इतर स्पर्धांमध्येही तिने यश मिळवले आहे.

आपल्या मुलीने कुस्तीमध्ये भारताचे नेतृत्त्व करावे, अशी सोनालीच्या वडिलांची इच्छा होती. मात्र, घरची परस्थिती आड येत होती. तरीही त्यांनी जिद्द सोडली नाही. एखाद्या ध्येयप्राप्तीसाठी खडतर परिश्रम करावे लागले तरी त्याची दखल घेणारे लोकही समाजात असतातच. अशा प्रयत्नांना योग्यवेळी मिळणाऱ्या मदतीमुळे पुढील प्रवासही निश्चितच सोपा होतो जणू हे त्यांना समजलेच होते. त्यातूनच त्यांनी जिद्द सोडली नाही. जे शक्य तेवढे त्यांनी तिला पाठबळ दिले. 

घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने सोनालीने कोरोना व्हायरसमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये छोट्याशा पत्र्याच्या शेडमधे सरावाला सुरुवात केली. सोनाली सध्या कर्जतमध्ये १२ वीचे शिक्षण घेत आहे. तिच्या संघर्षाची कहाणी राष्ट्रवादीचे कर्जत- जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांना समजली. त्यांनी त्याची दखल घेतली आहे. तिच्या प्रशिक्षणाची जबाबदारी आपण घेत असल्याचे आमदार पवार यांनी सांगितले आहे. याबाबत त्यांनी टविट् केले आहे. त्यांनी म्हटलं आहे. की, सोनालीने खडतर परिस्थितीत मिळवलेल्या या यशाचा मला अभिमान आहे.

तिच्याशी, तिचे पालक आणि वस्ताद यांच्याशी माझं बोलणंही झालं. या भगिनीच्या प्रशिक्षणाची जबाबदारी मी स्वीकारलीय. यशाची अशी अनेक शिखरं ती सर करेल, असा मला विश्वास आहे.

कर्जतमधील शिव छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा मंडळाचे अध्यक्ष सुभाष तनपुरे म्हणाले, आमदार रोहित पवार यांनी सोनालीचा होणारा खर्च देण्याचे जाहीर केले आहे. सोनाली म्हणाली, आमदार पवार यांनी मला काय मदत हवी आहे, अशी विचारणा केली होती. माझे प्रशिक्षक यांच्याशी त्यांचे बोलणे झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Rohit Pawar help to Sonali Mandlik from Kaparewadi