esakal | नगर- करमाळा- सोलापूर महामार्गाच्या कामासासाठी आमदार रोहित पवार यांनी घेतली गडकरींची भेट
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Rohit Pawar meet on Gadkari for work on Nagar Karmala Solapur highway

नगर- करमाळा- सोलापूर महामार्गाचे काम करावे, या मागणीसाठी आमदार रोहित पवार यांनी नितीन गडकरी यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी मतदारसंघातील इतर रस्त्याचीही मागणी केली आहे.

नगर- करमाळा- सोलापूर महामार्गाच्या कामासासाठी आमदार रोहित पवार यांनी घेतली गडकरींची भेट

sakal_logo
By
निलेश दिवटे

कर्जत : नगर- करमाळा- सोलापूर महामार्गाचे काम करावे, या मागणीसाठी आमदार रोहित पवार यांनी नितीन गडकरी यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी मतदारसंघातील इतर रस्त्याचीही मागणी केली आहे.

अहमदनगर- करमाळा- सोलापूर या राष्ट्रीय महामार्गांच्या चौपदरी करण्याचे काम भारतमाला प्रकल्पांतर्गत प्रस्तावित आहे. सद्यस्थितीत या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. मिरजगाव, घोगरगाव, माहीजळगाव या शहरी भागातील रस्त्याची अवस्थाही बिकट आहे. त्यामुळे या रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी लवकरात लवकर कंत्राटदार नेमून काम सुरु करावे, अशी विनंती त्यांनी गडकरी यांना केली. या कामासाठी अडथळा असलेला भूसंपादनाचा आणि इतर प्रश्न जिल्हा प्रशासनाच्या पातळीवर पाठपुरावा करून मार्गी लावले आणि याबाबत चा अंतिम प्रस्ताव आपल्या विभागाकडे देण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी गडकरी यांना सांगितले.

राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणांतर्गत शहरी भागातील बाह्यवळण मार्गाकडेही लक्ष दिले जाते. त्याप्रमाणे मतदारसंघातील बाह्यवळण रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे कामही राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणांतर्गत करावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

सध्या वाहतुकीसाठी बाह्यवळण मार्गाऐवजी नागरिक इतर रस्त्यांना प्राधान्य देत आहेत, तेव्हा शहरी भागातील या रस्त्यांचेही काँक्रिटीकरन करणे गरजेचे आहे.  राष्ट्रीय महामार्ग ६१ जवळच्या अहमदनगर आणि करमाळा, टेंभूणी, परिते, करकंब, पंढरपूर, मंगळवेढा या भागांना जोडून कर्नाटकातील विजापूरजवळ महामार्ग ५२ ला समाप्त होणारा महामार्ग या रस्त्यांच्या चौपदरीकरणाचे काम राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण व राष्ट्रीय महामार्ग यांच्याकडून सुरु आहे. 

राज्यात हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करण्यात आला आहे. हा अतिशय महत्त्वाचा रस्ता असून त्याचे लवकरात लवकर चौपदरीकरण होणे महत्त्वाचे आहे. याकडेही त्यांनी गडकरी यांचे लक्ष वेधले. तसेच श्रीगोंदा- जामखेड मार्गाच्या विकासाबाबतही सकारात्मक चर्चा झाली आणि येणाऱ्या अंदाजपत्रकात त्यासाठी भरीव तरतूद केली जाईल, असा विश्वास वाटतो.

संपादन : अशोक मुरुमकर