esakal | कर्जत-जामखेडच्या शेतकरी कृषी दिंडीने घेतले कांदा पिकाच्या तंत्रज्ञानाचे धडे
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Rohit Pawar's meticulous planning is underway to make the farmers of Karjat Jamkhed taluka self-sufficient in onion production and to change the economy of the farmers.

कर्जत-जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी कांदा उत्पादनात स्वयंपूर्ण व्हावे, तसेच शेतकऱ्यांचे अर्थकारण बदलावे.

कर्जत-जामखेडच्या शेतकरी कृषी दिंडीने घेतले कांदा पिकाच्या तंत्रज्ञानाचे धडे

sakal_logo
By
वसंत सानप

जामखेड (अहमदनगर) : ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती, कर्जत-जामखेड इंटीग्रेटेड डेव्हलपमेंट फाउंडेशन, कृषी विभाग महाराष्ट्र शासन व कांदा लसून संशोधन केंद्र राजगुरुनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आ.रोहित पवार यांच्या संकल्पनेतून व सहकार्याने कर्जत व जामखेड तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा नुकताच झाला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कर्जत-जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी कांदा उत्पादनात स्वयंपूर्ण व्हावे, तसेच शेतकऱ्यांचे अर्थकारण बदलावे. यासाठी आमदार रोहित पवारांचे सूक्ष्म नियोजन सुरू आहे. याचाच भाग म्हणून राजगुरूनगर येथील कांदा-लसूण संशोधन केंद्रावर कर्जत जामखेडच्या शेतकऱ्यांची कांदा दिंडी काढण्यात आली होती. कांदा लसूण संशोधन केंद्राचा दौरा केल्यानंतर या दिंडीने बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रासह कांदा उत्पादकांच्या प्रक्षेत्रावर पाहणी व अभ्यास दौरा केला.

मतदारांना वाटलेल्या पैशांची वसुली, पारनेरमध्ये पराभूत उमेदवारांकडून दमदाटी

कांदा पिकविषयक मार्गदर्शन देण्यासाठी राजगुरुनगर येथील कांदा लसूण संशोधन केंद्राचे डॉ. काळे यांनी कांदा पिकाचे नवीन वाण, हंगामानुसार वाण, लागवड तंत्रज्ञान, खत व्यवस्थापन, रोग व किड नियंत्रण, निर्यात योग्य वाण व साठवणूक पद्धती या विषयी सखोल मार्गदर्शन केले. यावेळी प्रक्षेत्रावरील कांदा पिकाचे प्रात्यक्षिके व साठवणूक पद्धतीची पाहणी करण्यात आली. या कांदा दिंडीत कर्जत व जामखेड तालुक्यातील महिला व पुरुष शेतकरी उपस्थित होते.
 

loading image