
अहिल्यानगर: सध्या मोठ्या प्रमाणात हिंदू समाजाला त्यातल्या त्यात हिंदू महिलांना ठरावीक लोकांकडून टार्गेट केले जात आहे. म्हणून हिंदूंनी आता काळाची पावले ओळखून जागृत झाले पाहिजे. लव्ह जिहाद विरोधात कडक कायद्याची मागणी मी सातत्याने करत आहे. राज्यातील सरकार हे हिंदुत्ववादी विचारांचे आहे. त्यामुळे लवकरच हा कायदा होणार आहे. आज राखी पौर्णिमा साजरी करताना लव्ह जिहाद विरोधात प्रत्येक महिलेमध्ये जनजागृती करण्याचा संकल्प सर्व महिला भगिनींनी करावा, असे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले.