
श्रीगोंदे : राज्यात दररोज विक्री होणारे ७० ते ७५ टक्के पनीर आणि चीज हे कृत्रिम किंवा बनावट (ॲनालॉग) असते. अवघे २५ ते ३० टक्के पनीर शुद्ध दुधापासून तयार होते. राज्यात अनेक ठिकाणी ‘ॲनालॉग’ पनीर म्हणजे कृत्रिम किंवा बनावट (फेक) पनीर या नावाने विक्री होते. यावर बंदी घाला, अशी मागणी आमदार विक्रम पाचपुते यांनी बुधवारी विधानसभेत केली. कृत्रिम पनीरच्या गंभीर मुद्द्यावर आवाज उठवण्यासाठी अधिवेशनात थेट पनीरचे पॅकेट घेऊन पाचपुते गेले होते. त्यांनी लक्ष्यवेधी सूचनेद्वारे त्यांनी या विषयाकडे सरकारचे लक्ष वेधले.