
संगमनेर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सूचनेनुसार पहिली ते चौथीपर्यंतच्या शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषा सक्तीने शिकवण्याच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. शनिवारी (ता. २१) संगमनेर शहरातील इंग्रजी व मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये मुख्याध्यापकांना राज ठाकरे यांचे पत्र सुपूर्द करण्यात आले.