बोगस आधारकार्ड व रेशनकार्डच्या आधारे अनेक परप्रांतीय नागरीक झाले मतदार; मनसेची तक्रार

मार्तंड बुचुडे
Friday, 18 December 2020

सुपे ग्रामपंचायत मतदार यादीत बोगस अधारकार्ड व रेशन कार्डच्या अधारे तात्पुरते रहिवाशी असलेल्या 91 परप्रांतीय नागरिकांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत.

पारनेर (अहमदनगर) : सुपे ग्रामपंचायत मतदार यादीत बोगस अधारकार्ड व रेशन कार्डच्या अधारे तात्पुरते रहिवाशी असलेल्या 91 परप्रांतीय नागरिकांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. हे मतदार सुपे नजिक असलेल्या गट क्रमांक 42 मध्ये मोकळ्या जागेत झोपडीत रहात आहेत.

त्याचे दर सहा महिन्यानी स्थलांतर होत असते तरीसुद्धा त्यांना राजकीय हस्तक्षेप करून मतदार केले आहे. त्यांची नांवे मतदार यादीतून वगळावीत, अशी मागणी महाराषट्र नव निर्माण सेनेचे जिल्हाअध्यक्ष सचिन डफळ यांनी केली आहे.

नव्याने मतदार झालेले हे परप्रांतीय यांना बोगस आधार कार्ड व रेशन कार्ड देऊन मतदार केले असल्याचा आरोप डफाळ यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्जाद्‌वारे केला आहे. सुपे- वाळवणे रस्त्या लगत गट नंबर 42मध्ये पालात तात्पुरता साधा निवारा करून हे लोक रहात आहेत. याबाबत ग्रामविकास अधिका-यांनी सुद्धा पहाणी करून अहवाल सादर केला आहे. ही नावे बोगस असल्याचे निष्पन्न झाले आहे.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
नविन मतदार नोंदणी करताना किमान 15 वर्ष रहिवाशी असल्याचा पुरावा ग्राह्य धरला जातो. तसा पुरावा ही सदर नाव नोंदणीत नाही हे माहीती अधिकारत सिध्द झाले. तरी कुठल्या आधारावर ही नाव नोंदणी झाली या करता अनेक राजकीय सामाजिक संघटना नी तहसीलदारांना निवेदने दिली तरीही ही नावे मतदान यादीतून वगळले नाहीत.

तहसीलदार स्थानिक आमदाराच्या दबावाखालती काम करत असुन स्थानिक आमदार व सरपंच यांनी मुस्लिम मतदान घडऊन आनण्यासाठी ही नांवे समाविष्ट केली असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्मानसेनेने केला आहे. ही नांवे मतदार यादीतून कमी करण्यात यावीत, अशी विनंती जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी यांना मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.

अन्यथा मनसेच्या वतीने आपल्या दालनात आंदोलन करण्याच येईल असा ईशारा मनसेच्या वतीने जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, जिल्हा सचिव नितीन भुतारे, पारनेर तालुकाध्यक्ष बाळासाहेब माळी, अविनाश पवार, नितीन म्हस्के आदींनी दिला आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS lodges complaint with Supe tehsildar regarding names of fake voters