esakal | नगरसेविकेच्या पतीच्या खिशातच मोबाईलचा स्फोट; एकच खळबळ
sakal

बोलून बातमी शोधा

Mobile-Blast

नगरसेविकेच्या पतीच्या खिशातच मोबाईलचा स्फोट

sakal_logo
By
संजय काटे

श्रीगोंदे (जि. नगर) : श्रीगोंद्याच्या नगरसेविका सीमा गोरे यांचा मोबाईल नादुरुस्त झाला. दुरुस्तीसाठी त्यांचे पती प्रशांत यांनी मोबाईल नेला. मात्र, तो बंद स्थितीत खिशात राहिला. चोवीस तासांनंतर अचानक मोबाईलचा पँटच्या खिशात स्फोट झाल्याने खळबळ उडाली. गोरे यांना किरकोळ दुखापत झाली. (mobile-blast-in-pocket-of-corporator-seema-gores-husband-nagar-marathi-news)

मोबाईलच्या स्फोटने सगळीकडे खळबळ

याबाबत पोलिस ठाण्यात कुठलीही नोंद झाली नसली, तरी गोरे यांनी ही माहिती दिली. ही माहिती संबंधित मोबाईल कंपनीपर्यंत गेल्यावर त्यांना आज नवा मोबाईल देण्यात आला. सीमा गोरे यांचा मोबाईल खराब झाला होता. बंद अवस्थेत तो गोरे यांच्या खिशात राहिला. मात्र, नंतर अचानक मोबाईलचा स्फोट झाला. यात गोरे यांच्या मांडीला भाजले. मोबाईलचा स्फोट झाल्याने सगळीकडे खळबळ उडाली.

(mobile-blast-in-pocket-of-corporator-seema-gores-husband-nagar-marathi-news)

हेही वाचा: मुंबई दंगलीच्या वेळी दिलीप कुमार-शरद पवार भेटीचा फोटो, शबाना आझमींनी केला शेअर

loading image