esakal | मुंबई दंगलीच्या वेळी दिलीप कुमार-शरद पवार भेटीचा फोटो, शबाना आझमींनी केला शेअर
sakal

बोलून बातमी शोधा

Dilip Kumar, shabana azmi, sharad pawar

मुंबई दंगलीच्या वेळी दिलीप कुमार-शरद पवार भेटीचा फोटो, शबाना आझमींनी केला शेअर

sakal_logo
By
स्वाती वेमूल

ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी Shabana Azmi यांनी सोशल मीडियावर एक जुना फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये शबाना आझमी यांच्यासोबत दिवंगत अभिनेते दिलीप कुमार Dilip Kumar आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar पहायला मिळत आहेत. मुंबई दंगलीवेळी काढलेला हा फोटो आहे. त्यावेळी शबाना आझमी आणि दिलीप कुमार यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. 'मुंबई दंगलीवेळी शरद पवारजींसोबत दिलीप साहब आणि मी', असं कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलं आहे. (Shabana Azmi shares a throwback picture with Dilip Kumar from their meet with Sharad Pawar)

दिलीप कुमार यांचे बुधवारी (७ जुलै) निधन झाले. त्यांच्या निधनानंतर शबाना आझमींनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित शोक व्यक्त केला होता. 'दिलीप साहब यांना अखेरचा निरोप. मी तुमची एकलव्य होते. चित्रपटांसाठी, भाषेसाठी, सन्मानासाठी, सामाजिकदृष्ट्या जबाबदार असल्याबद्दल धन्यवाद', अशी पोस्ट त्यांनी लिहिली होती. शबाना आझमी या दिलीप कुमार यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचल्या होत्या. त्यानंतर आता त्यांनी सोशल मीडियावर आणखी एक फोटो पोस्ट करत जुन्या आठवणी जागवल्या आहेत.

हेही वाचा: आता उरल्या फक्त आठवणी.. दिलीप कुमार यांना शेवटचं बिलगून रडल्या सायरा बानो

शबाना आझमींनी पोस्ट केलेल्या या फोटोवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. 'धर्मनिरपेक्षतेची खरी भावना त्यांनी उंचावली होती. त्यांची अनुपस्थिती आज जाणवली जाईल', अशा शब्दांत काही नेटकऱ्यांनी भावना व्यक्त केल्या. 'दिलीप कुमार हे प्रत्येक पिढीसाठी प्रेरणा होते', असं एकाने लिहिलं. दिलीप कुमार यांनी वयाच्या ९८व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण कलाक्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

loading image