लॉरेन्स स्वामीसह आठजणांना लावला मोक्का

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 26 December 2020

नगर-सोलापूर रस्त्यावरील भिंगार छावणी परिषदेच्या जकात नाक्‍यावर काही तरुणांनी धुडगूस घालून कर्मचाऱ्यांना मारहाण करीत दरोडा घातला होता.

नगर: दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपी लॉरेन्स स्वामी याच्यासह आठ जणांविरुद्ध पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी "मोक्का' च्या प्रस्ताव विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांच्याकडे पाठविला होता. त्याला डॉ. दिघावकर यांनी मंजुरी दिल्याची माहिती पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. 

प्रकाश भिंगारदिवे (रा. निंबोडी), संदीप शिंदे (रा. बुरूडगाव रस्ता), विक्रम गायकवाड(रा. वाळूंज, ता. नगर), बाबा उर्फ भाऊसाहेब आढाव, संदीप भिंगारदिवे, बाळासाहेब भिंगारदिवे, लॉरेन्स दोराई स्वामी(रा. भिंगार) अशी त्यांची नावे आहेत. 

नगर-सोलापूर रस्त्यावरील भिंगार छावणी परिषदेच्या जकात नाक्‍यावर काही तरुणांनी धुडगूस घालून कर्मचाऱ्यांना मारहाण करीत दरोडा घातला होता. त्यात लॉरेन्स स्वामीसह वरील आरोपींची नावे निष्पन्न झाली होती. भिंगार पोलिसांनी सिनेस्टाईल लॉरेन्स स्वामी याला त्याच्या राहत्या घरातून अटक केली होती.

लॉरेन्स स्वामीसह अन्य आरोपींविरुद्ध भिंगार कॅम्प पोलिसांनी मोक्का (महाराष्ट्र राज्य संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा) कारवाईचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे पाठविला होता. त्यांनी तो प्रस्ताव विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांच्याकडे पाठविला. डॉ. दिघावकर यांनी प्रस्तावाला मंजुरी दिली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mocca against eight, including Lawrence Swamy