
नगर ः जिल्ह्यात मालमत्ताविषयक गुन्हे करणाऱ्या नयन तांदळे टोळीतील पाच जणांवर नाशिकच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मोक्का) कारवाई केली. या टोळीतील गुन्ह्यांचा तपास पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. (Mocca to five members of the Nayan Tandale gang)
नयन राजेंद्र तांदळे, विठ्ठल साळवे, अक्षय ठोंबरे, शाहुल पवार व अमोल पोटे, अशी आरोपींची नावे आहेत. पुण्यातील अक्षय चखाले यांनी सुपे पोलिस ठाण्यात मालमत्तेसाठी दमदाटी व बळाचा उपयोग केल्याची फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास करून तांदळे टोळीविरोधात मालमत्तेवरून दरोडेखोरीचा गुन्हा नोंदविला होता, तसेच नयन तांदळेसह पाच जणांना अटक केली होती. नयन तांदळे टोळी कोणताही कामधंदा न करता संघटितपणे बेकायदेशीररीत्या मालमत्ता व्यवहार, हिंसाचार, जबरी चोरी, दरोडे घालत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी "मोक्का'अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव नाशिकच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे पाठविला होता. त्यांनी प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे तपास वर्ग केला आहे.
नयन तांदळेविरोधात सुपे पोलिस ठाण्यात दोन, तोफखाना पोलिस ठाण्यात सहा, विठ्ठल साळवेविरोधात सुपे पोलिस ठाण्यात दोन, तोफखाना पोलिस ठाण्यात एक, अक्षय ठोंबरेविरोधात सुपे पोलिस ठाण्यात एक, शाहुल पवारविरोधात सुपे पोलिस ठाण्यात चार, तर अमोल पोटेविरोधात सुपे पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत.(Mocca to five members of the Nayan Tandale gang)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.