
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार व भाजपची वाटचाल यशस्वीपणे सुरु आहे.
पाथर्डी (अहमदनगर) : पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार व भाजपची वाटचाल यशस्वीपणे सुरु आहे. भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे. इतर पक्ष फक्त कागदावर चालतात. कार्यकर्त्यांनी पक्षाचे विचार व केंद्रातील मोदी सरकारच्या योजना सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम करावे, असे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले.
नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
पाथर्डी तालुका भाजपा दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन आमदार राजळे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरूण मुंडे होते. प्रमुख पाहुणे म्हणुन माजी मंत्री शिवाजी कर्डीले होते. रविंद्र सुरवसे, बाळासाहेब महाडिक, दिलिप भालसिंग, भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, जेष्ठ नेते अशोक चोरमले, नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, गोकुळ दौंड, रविंद्र वायकर, मनिषा घुले, काशीबाई गोल्हार, मंगल कोकाटे, यांच्यासह भाजपाचे आजी माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक भाजपाचे पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, बुथ प्रमुख यांच्यासह कार्यकर्ते उपस्थीत होते.
यावेळी बोलतांना राजळे म्हणाल्या, मोदी सरकारने ७० वर्षातील प्रलंबित प्रश्न सहा वर्षात सोडविले आहेत. त्यामुळे पक्षाची लोकप्रियता वाढतच आहे. सामान्य माणसाला पक्ष आपला वाटतो. दोन दिवसाचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर खुप महत्वाचे आहे. पक्ष याची दखल घेऊन योग्य कार्यकर्त्याना भविष्यात जबाबदारी दिली जाते. त्यामुळे दोन दिवसाचे शिबीरासाठी पुर्ण वेळ उपस्थित रहावे.
शिबीरात राहुल जमादार, अंतु वारुळे, नितीन उदमले, दिलीप भालसिंग, अनिल लांडगे, बाळासाहेब महाडिक, सुभाष गायकवाड यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, सुत्रसंचालन राजीव सुरवसे यांनी केले. आभार आदिनाथ धायतडक यांनी मानले. प्रशिक्षण शिबीर सुरू करण्यापुर्वी मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
संपादन : अशोक मुरुमकर