esakal | शुल्कसवलतीचा निर्णय हा मोदींच्या प्रेरणेनेच : विखे पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

radhakrishna vikhe patil

शुल्कसवलतीचा निर्णय हा मोदींच्या प्रेरणेनेच : विखे पाटील

sakal_logo
By
टीम ई सकाळ

शिर्डी : ‘‘मराठा व ओबीसी आरक्षणाबाबत (maratha and OBC reservation) केवळ चर्चा करण्याऐवजी, जे आपल्या हातात आहे, त्यावर प्रत्यक्ष कृती करण्यावर आपण भर देतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या व्यापक विचारांपासून प्रेरणा घेऊन आपण प्रवरा शिक्षण संस्थेत मराठा व ओबीसी विद्यार्थ्यांना पन्नास टक्के शुल्कसवलत देण्याचा निर्णय घेतला. राज्यातील इतर आमदार व खासदारांना असा निर्णय घेण्याची विनंती करणारे पत्र आपण धाडले आहे,’’ असे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. (Modi-inspired-to-take-decision-for-reduce-fees-said-Vikhe-Patil-jpd93)

राज्यात चार कोटी लोकांचे कोविड लसीकरण मोदींमुळेच पूर्ण - विखे पाटील

विखे पाटील म्‍हणाले, की केंद्र सरकारने सामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेतले. पंतप्रधानांच्‍या प्रेरणादायी विचारातून प्रवरा संस्‍थेच्‍या माध्‍यमातून मराठा, ओबीसी समाजातील विद्यार्थ्‍यांसाठी शुल्क माफ करण्‍याचा निर्णय केला. राज्यात चार कोटी लोकांचे कोविड लसीकरण मोदींमुळे पूर्ण झाले.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एक महिन्याचे वेतन

कोकणवासीयांवर अभूतपूर्व आपत्ती कोसळली. त्यांच्या मदतीसाठी राहाता तालुक्यातून मदत संकलित करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. आपण पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आमदार म्हणून मिळणारे एक महिन्याचे वेतन दिले आहे. - राधाकृष्ण विखे पाटील, आमदार, शिर्डी मतदारसंघ

या निर्णयाबद्दल भाजपच्या ओबीसी आघाडीच्‍या वतीने त्यांचा सत्‍कार करण्‍यात आला. त्यावेळी ते बोलत होते. ओबीसी आघाडीचे प्रदेश उपाध्‍यक्ष प्रकाश चित्‍ते, शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, नितीन कापसे, ओबीसी आघाडीचे प्रदेश सचिव नंदकुमार जेजूरकर, जिल्‍हाध्‍यक्ष बाळासाहेब गाडेकर, सतीश बावके, बाळासाहेब डांगे, पुष्‍पलता हरिदास, रवींद्र चव्‍हाण व मनोज हिवराळे यांच्‍यासह पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा: अहमदनगर : निर्बंध कायम, मात्र वरखेड जत्रेत मोठी गर्दी!

हेही वाचा: घरगुती गॅस सिलिंडरची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश!

loading image
go to top