
अकोले: अकोले तालुक्यातील एका शासकीय आश्रमशाळेतील ५ अल्पवयीन मुलींची शिक्षकानेच छेड काढून विनयभंग केल्याची घटना दोन वर्षांनी उघडकीस आली. पीडितेने अकोले पोलिसांत फिर्याद दाखल केल्यानंतर भाऊराव राया धूपकर या शिक्षकाला अटक केली असून, मुख्याध्यापिका, शिक्षिका व एक शिपाई असे तीन जण फरार आहेत.