esakal | Jamkhed : सावकारांविरोधात जनजागृती मोहीम
sakal

बोलून बातमी शोधा

Jamkhed : सावकारांविरोधात जनजागृती मोहीम

Jamkhed : सावकारांविरोधात जनजागृती मोहीम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जामखेड : तालुक्यात खासगी सावकारांविरुद्ध पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी जनजागृती अभियान राबविले. त्यामुळे या सावकारांविरुद्ध तक्रार देण्यास नागरिक पुढे येऊ लागले आहेत. या मोहिमेमुळे अवैध सावकारीची पाळेमुळे समूळ नष्ट होण्याची आशा पल्लवित झाली आहे.

जामखेड तालुक्यात मागील अनेक वर्षांपासून खासगी सावकारी फोफावलेली आहे. मागील आठवड्यात खासगी सावकारांविरुद्ध पोलिसांत एकापाठोपाठ एक गुन्हे दाखल झाले. ग्रामीण भागात शेतकरी खासगी सावकारांचे भक्ष्य ठरले आहेत. या पाशात अडकलेल्यांचा पाय अधिकच खोल जाऊन, गहाणखत लिहून दिलेल्या शेताच्या सात-बारावर सावकाराच्या नावाची मोहर उमटू लागली आहे. तासाला, दिवसाला, महिन्याला मुद्दलाच्या दामदुप्पट व्याजदर आकारले जातात. सावकारांच्या या जोखडातून कर्जदारांना बाहेर काढण्यासाठी पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी जनजागृती मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे नागरिकांची पोलिसांबाबतची विश्‍वासार्हता वाढली आहे. एकापाठोपाठ एक गुन्हे दाखल होऊ लागले आहेत.

...तर अनेकांची सुटका होईल

प्रत्येक गावात खासगी सावकारी करणारे ठक आहेत. पोलिसांनी गावोगावच्या खबऱ्यांमार्फत माहिती घेऊन त्यांना लक्ष्य बनविले, तर त्यांच्यावरील कारवाई अधिक गतिमान होईल. या जुलमी जोखडातून अनेकांनी वेळेत सुटका होईल.

loading image
go to top