
पाथर्डी : शेवगाव तालुक्यातील पैठण-पंढरपूर पालखीमार्ग, तसेच पाथर्डी तालुक्यातून जाणाऱ्या खरवंडी कासार ते नवगण राजुरी हा मार्ग, तसेच शेवगाव शहर बाह्यवळण रस्ता या कामासंदर्भातील अडचणी तातडीने दूर करण्याचे आदेश राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले. ही कामे तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी आमदार मोनिका राजळे यांनी भोसले यांच्याकडे केल्यानंतर त्यांनी या विषयवार मुंबई येथे संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली.