
पाथर्डी : तालुक्यात चालू असलेल्या भगवानगड पाणी योजनेच्या कामाची अधिवेशन संपल्यावर आपण स्वतः पाहणी करणार आहे. हे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनी व योजनेशी संबंधित अधिकाऱ्यांनी या योजनेचे गांभीर्य लक्षात घेत योजना लवकर पूर्ण करण्याला प्राधान्य द्यावे, असे मत आमदार मोनिका राजळे यांनी व्यक्त केले.